हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर – VIDA VX2 – चे अनावरण केले आहे, ज्यामध्ये बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) मॉडेल सादर केले आहे ज्याचा उद्देश इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना अधिक परवडणारे आणि सुलभ बनवणे आहे. चॉईस इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, या धोरणात्मक हालचालीमुळे दुचाकी वाहनांच्या विभागात बीएएएस BaaS देणारी हीरो ही पहिली ओईएम …
Read More »फॉक्सकॉन कंपनीतून ३०० इंजिनियर्स चीनला परत पाठवले भारतातील प्रकल्पात चीनचे इंजिनियर्स काम करणार नसल्याची माहिती
अॅपलची सर्वात मोठी आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने बुधवारी तिच्या भारतीय उत्पादन सुविधांमधून ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना परत बोलावले आहे, असे ब्लूमबर्गने वृत्त दिले. आयफोन १७ उत्पादनाची तयारी अॅपलने सुरू केल्याने या निर्णयामुळे ऑपरेशनल अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन लाइन सेटअप आणि तांत्रिक …
Read More »नागपंचमीला जिवंत नागाची पुजा करण्यास परवानगी द्या-आमदारांची विधानसभेत मागणी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी केली मागणी
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील जागतिक कीर्तीच्या नागपंचमी सणात जिवंत नागाची पूजा करण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच गुरू गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या प्रथेवर शासनाने बंदी घातली. त्यामुळे मातीचे नाग बनविण्यात येऊन त्याची पुजा केली जाते असे सांगत ,सर्वपक्षीय आमदारांनी नागपंचमी सणाला जिवंत नागाची पुजा करण्याची …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निकृष्ट कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण डेमोक्रॅटिक आरपीआयच्या आंदोलनाची दखल
मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. …
Read More »वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती
राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत ॲपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी दिली. या संदर्भात …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपस्थित प्रश्नावर उत्तर देताना दिली माहिती
राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी विहित नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात पूर्वी अनेक शाळांना कायम …
Read More »पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या काम करणाऱ्यांनाच संघटनेत मिळणार पदे, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात काम करणा-या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात खरेदीची परवानगी
बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन …
Read More »पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमलीपदार्थ तस्करी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई कायद्यात बदल करणार असल्याचे दिले आश्वासन
‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील …
Read More »
Marathi e-Batmya