Editor

एनएफआरए स्पष्टोक्ती, आता लेखा परिक्षणाच्या कामाला लेखा परिक्षक जबाबदार कामाच्या पध्दतीत सुधारणा करण्याचा सर्व लेखापरिक्षण संस्थांना सल्ला

नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटीने मंगळवारी सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी ऑडिटिंग ६०० (SA 600) वर सुधारित मानक जारी केले, जे कॉर्पोरेट फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये हायलाइट केलेल्या कंपन्यांच्या समूह ऑडिटमधील कमतरता दूर करेल. सुधारित निकषांनुसार, इतर लेखापरीक्षकांनी समूह संस्थांसाठी केलेल्या लेखापरीक्षणाच्या कामासाठी समूह लेखापरीक्षक जबाबदार असतील. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक …

Read More »

आयएमएफच्या अहवालात धक्कादायक माहिती, रेवडीच्या नावाखाली दिवाळखोर योजना भाजपाशासित राज्य सरकारांकडून लोकांची मते मिळविण्यासाठी योजना

कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्य सरकारांना त्यांच्या आर्थिक गैरव्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर फटकारण्यात आले आहे. एनडीए आणि काँग्रेस या दोन्ही राज्यांची सत्ता असलेल्या राज्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन देऊन त्यांची तिजोरी जवळपास रिकामी केली आहे. काही राज्ये इतकी लालफितीत आहेत की त्यांना पगार किंवा पेन्शन देता आलेली …

Read More »

वाजतगाजत गणपतीला निरोपः भक्तांकडून पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विसर्जन दुपारपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि गणेशभक्तांचा जल्लोष

मागील १० दिवसांपासून हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या गणपती-गौरीला पूजत गणेशोत्सव साजरा केला. या १० दिवसांच्या कालावधीत अनेक वाईट गोष्टीपासून दुर राहण्याचा संकल्प करत अनेकांनी मनोभावे पूजा करत गणपती आणि गौरीचा आज सन्मानपूर्वक निरोप दिला. तर अनेक गणेश भक्तांनी आणि गणपती मंडळांनी गणपतीला पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विधिवत समुद्राच्या पाण्यात, कृत्रिम …

Read More »

‘बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’ मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ चित्रपट येतोय २७ सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये

अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो, छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो. शिलादित्य बोरा यांची …

Read More »

सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजनावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे उत्तर गणपतीच्या पुजनाला गेल्याने काँग्रेसची पोटदुखी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले. त्यावरून पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश यांच्यावर सर्वचस्तरातून टीका करण्यात आली. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी उत्तर देत म्हणाले की, गणेश पूजेसाठी मी सहभागी झाल्यामुळे काँग्रेसकडून टीका करण्यात येत असल्याचे सांगितले. भुवनेश्वरमध्ये मंगळवारी …

Read More »

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन, नेत्रदानाचा संकल्प करा नेत्रदान ही लोकचळवळ बनावी

नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे २८ ऑगस्ट ते ८ …

Read More »

बुलडोझर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, दोन आठवड्यात आकाश कोसळणार नाही आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालविण्यापासून लांब राहण्याची दिली तंबी

एखाद्या व्यक्तीबद्दल तो एखाद्या गुन्ह्यात आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही आणि त्याच्या परवानगीशिवाय त्याचे घर पाडता येणार नाही असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी आर गवई आणि के विश्वसनाथन यांच्या खंडपीठाने बुलडोझर कारवाई प्रकरणावरील सुनावणी …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एकत्रित येणार ? वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा

आगामी विधानसभा निव़डणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर निवासी डॉक्टरांकरिता आवश्यक सोयी- सुविधांसाठी निधी देणार-'चिठ्ठीमुक्त घाटी' उपक्रमाचे कौतुक

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ‘चिठ्ठीमुक्त …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारची विनंती फेटाळली आरजी कार हॉस्पीटल आंदोलक आणि लाईव्ह स्ट्रिमिंग

९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजाचे लाइव्ह स्ट्रीमिंग थांबवण्याची पश्चिम बंगाल सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान लाईव्हस्ट्रीमिंग थांबविण्याबाबतची …

Read More »