Editor

जीएसटीचा दिलासा: जून्या खरेदी-विक्रीत ठिकाणावर आधारीत कर नाही जीएसटी परिषदेत घेतला निर्णय-नव्याने प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

प्रेफरेंशियल लोकेशन चार्जेस (PLC) च्या कर प्रक्रियेवर जीएसटी GST कौन्सिलच्या स्पष्टीकरणामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळाला, परंतु त्याच्या पूर्वलक्ष्यी लागू करण्याने त्यासंदर्भातील प्रश्न अजूनही शिल्लक आहेत, कारण ७,०००-८,००० कोटी रुपयांची मागील प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी, जीएसटी परिषदेने पीएलसीच्या कर उपचारांबाबत स्पष्टीकरण जारी केले. त्यात असे म्हटले …

Read More »

५०० किलोमीटर चालणारे इलेक्ट्रीक वाहन मारूती सुझुकी बनवणार मारूती सुझुकीच्या सीईओ हिसाशी ताकेउची यांची माहिती

नुकत्यात झालेल्या सियाम SIAM च्या वार्षिक अधिवेशनात, मारुती सुझुकीचे एमडी आणि सीईओ हिसाशी टेकुची Hisashi Takeuchi यांनी कंपनीच्या महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन (EV) रोडमॅपच्या योजनांचे अनावरण केले. त्यांच्या भाषणातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ६०-किलोवॅट-तास बॅटरीद्वारे, ५०० किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीचे वचन देणारी उच्च-विशिष्टीकरण ईव्ही वाहन बनविणार असल्याची घोषणा केली. या यशस्वी वाहनामुळे भारतात …

Read More »

टोल वसुलीबाबत सरकारकडून नवे नियमः आता किलोमीटरच्या प्रमाणात पैसे २० किलोमीटरचा प्रवास विना टोल

भारत सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत जे राष्ट्रीय महामार्गांवर वाहनचालक कसे टोल भरतात ते बदलतील. ट्रॅकिंगसाठी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) चा वापर करणाऱ्या अद्ययावत प्रणाली अंतर्गत, यांत्रिक वाहनांचे वापरकर्ते—नॅशनल परमिट असलेले वगळून—कोणतेही शुल्क न आकारता २० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतील. नवीन नियमांमध्ये असे नमूद केले आहे की वाहनचालक, …

Read More »

नारायण मुर्ती म्हणाले, कोचिंग क्लास यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही पॉल हेविट यांच्या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्ती प्रकाशप्रसंगी व्यक्त केले मत

कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही, असे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी सांगत देशभरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस पद्धतीवर थेट टीका करत जे विद्यार्थी त्यांच्या नियमित शालेय वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत ते बहुतेकदा या बाह्य वर्गांवर अवलंबून असतात अशी मल्लिनाथीही यावेळी जोडली. बेंगळुरू येथे …

Read More »

मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान, शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर आणि स्थानिक भाजपा आमदार खासदारांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्या. या घटनेमुळे महायुती सरकार धास्तावले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी शिवरायांच्या समाधीवरुन केलेल्या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची स्थिती …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान कुर्ल्यातील शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारी नोटीस

राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. मुंबई अदानीला विकूनच शिंदे-फडणवीसांचा आत्मा शांत होईल असे दिसत आहे. कुर्लाच्या मदर डेअरी कर्मचारी वसाहतीतील कुटुंबांना पर्यायी व्यवस्था न देताच १५ दिवसात घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती

विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारचा भूखंडावर ताव, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना बिल्डरमंत्री संजय राठोड लाभार्थी

महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल …

Read More »

पवन खेरा यांचा सेबी प्रमुखावर आरोप आणि महिंद्राची स्पष्टोक्ती माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीतून उत्पन्न मिळविल्याचा आरोप

काँग्रेसने मंगळवारी सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हितसंबंधांचे नवीन आरोप केले आणि दावा केला की त्यांचे पती धवल बुच यांना २०१९-२०२१ दरम्यान महिंद्रा आणि महिंद्रा समूहाकडून “वैयक्तिक क्षमतेने उत्पन्न” म्हणून ४.७८ कोटी रुपये मिळाले. महिंद्रा समूहाने हा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना …

Read More »

कॉम्रेड सीताराम येचुरी रूग्णालयात, प्रकृती चिंताजनक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

देशातील काँग्रेसच्या नेकृत्वाखालील युपीए १ आणि २ च्या काळात कॉम्रेड सीताराम येचुरी यांची भूमिका प्रामुख्याने महत्वाची ठरली होती. मात्र कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या आजारामुळे दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येचुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाच्यावतीने देण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये सांगण्यात …

Read More »