मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका
जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी येथील प्रचारसभेत बोलताना दहशतवाद शेवटची घटका मोजत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आज प्रचारसभा जम्मू काश्मीर मधील …
Read More »ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये …
Read More »सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
सोयाबीनची ९० दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टर …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, रात्रभर झोपले नाही… पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी
आरजी कार रूग्णालयातील दुर्घटनेप्रकरणावरून सुरु झालेले आंदोलन काही केल्या थांबायला तयार नागी. रूग्णालयाशी संबधित डॉक्टर्स आणि काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने लावून धरत आहे. याप्रश्नी आंदोलकांच्या भावनांचा आदर करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवित आंदोलन …
Read More »सोलारियम ग्रीन एनर्जीचा एसएमई आयपीओ बाजारात कागदपत्रे सेबीकडे दाखल
सोलारियम ग्रीन एनर्जीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करण्यासाठी बीएसई BSE कडे आपला मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. कंपनी एसएमई आयपीओ SME IPO ची तयारी करत आहे, ज्यामध्ये ५५,००,००० इक्विटी समभागांच्या शेअर विक्रीचा समावेश आहे. मात्र, कंपनीने अद्याप इश्यूचा आकार जाहीर केलेला नाही. सोलारियम ग्रीन …
Read More »निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्र हरयाणातील शेतकऱ्यांना असाही खुष करण्याचा भाजपाचा प्रयत्न निर्यातीवरील मार्केट कॅप काढली
हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. यातील हरयाणात सत्ताधारी भाजपाला बाहेरचा रस्ता स्थानिक जनतेकडून दाखविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची घोषणा होणे अद्याप बाकी असले तरी येथील वातावरणही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग भाजपावरील असंतोष कमी करण्यासाठी …
Read More »निवडक विक्रेत्यांवर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची मेहरबानी सीसीआय-भारतीय प्रतिस्पर्धी आयोगात तक्रार दाखल
अमेझॉन आणि वॉलमार्ट-समर्थित फ्लिपकार्ट या दिग्गजांचे वर्चस्व असलेले भारतीय ई-कॉमर्स लँडस्केप, कथित स्पर्धात्मक पद्धतींबद्दल भारतीय स्पर्धा आयोग (CCI) च्या छाननीखाली आहे. सखोल सवलत आणि विक्रेत्याच्या पूर्वाग्रहापासून ते उच्च मार्जिनपर्यंत, या प्लॅटफॉर्मच्या धोरणांवर अनेकदा नियामक आणि लहान किरकोळ विक्रेत्यांकडून टीका झाली आहे. एका विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या विनंतीनुसार, अॅमेझॉन Amazon अधिकारी …
Read More »सेबीने स्टॉक एक्सचेंजच्या विरोधातील प्रक्रिया थांबवली आयपीओसाठी मार्ग मोकळा करून देण्याचा निर्णय
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI ने कथित सह-स्थान प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE विरुद्ध कार्यवाही निकाली काढली आहे. १३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, सेबीने म्हटले आहे की, “को-लो (सह-स्थान) सुविधेच्या वापरासाठी एनएसईकडे तपशीलवार परिभाषित धोरण नाही या वस्तुस्थितीवर कोणताही वाद …
Read More »वाहनधारकांसाठी केंद्राचा नवा नियमः वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक वाहनधारकांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन योग्यता प्रमाणपत्र काढावे
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका आणि पोलीस विभागाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून काही प्रकाराच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढतांना वाहनधारकांना अडचणी …
Read More »
Marathi e-Batmya