Editor

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …

Read More »

छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य, मी बोलण्यापेक्षा माझं काम अधिक बोलतं… मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझी कामे अधिक बोलतात असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा,… सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवणार वंचित बहुजन आघाडीने बांधली सर्व आदिवासी पक्ष संघटनाची मोट!

आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन निवडणूक लढणार …

Read More »

५० एसएमई कंपन्यांनी आयपीओसाठी कागदपत्रे केली सादर बीएसई आणि एनएसीकडे कागदपत्रे सादर केली

बाजार नियामक सेबीसह सर्वत्र चिंता असूनही, ५० लघु आणि मध्यम उद्योगांनी भांडवल उभारणीसाठी बाजाराचा वापर करण्यासाठी गेल्या महिन्यात एनएसई इमर्ज NSE Emerge आणि बीएसई एसएमई BSE SME कडे कागदपत्रे दाखल केली असल्याचे वृत्त बिझनेसलाईन या संकेतस्थळाने दिले आहे. जवळपास ५५-७० कंपन्या या महिन्यात बाजारात येऊन सुमारे ₹५०० कोटी जमा करतील. …

Read More »

बँक ऑफ इंडियाच्या अग्रेसिव्ह हायब्रीड म्युच्युअल फंडाबद्दल एकलय का १० हजाराच्या एसआयपीतून पाच वर्षात १३ लाख मिळाले

अग्रेसिव्ह हायब्रीड फंड ही म्युच्युअल फंडांची एक श्रेणी आहे जी शेअर्स आणि डेट इन्स्ट्रुमेंट्स या दोन्हीमधील गुंतवणूक एकत्र करतात, ज्यात इक्विटीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. विशेषत:, हे फंड त्यांच्या मालमत्तेपैकी ६५% ते ८०% इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजसाठी वाटप करतात, तर उर्वरित २०% ते ३५% कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये …

Read More »

उत्तम परताव्यासाठी कोणत्या शहरात गुंतवणूकीचा विचार करताय मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता शहरांचा पर्याय

चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता ही २०२४ मध्ये निवासी गुंतवणुकीसाठी सर्वात परवडणारी शहरे म्हणून उदयास आली आहेत. ही शहरे भारतातील टॉप १० प्रॉपर्टी मार्केटमध्ये सर्वात कमी किंमत-ते-उत्पन्न (P/I) गुणोत्तर देतात, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी आदर्श बनतात. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि दिल्ली हे सर्वात कमी परवडणारे आहेत, घरातील उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्तेच्या …

Read More »

निवृत्तीनंतर एनपीएसकडून मासिक ५० हजार रूपये पेन्शन हवीय? या गोष्टी करा गुंतवणूक आणि पगारातील ही ठराविक रक्कम जमा करा

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणे हे निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळविण्यासाठी एक विवेकपूर्ण धोरण असू शकते. आता एनपीएस NPS मध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करून, तुम्ही भविष्यासाठी भरीव सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता, कारण एय़ुएम AUM वर अवलंबून ०.०९% ते ०.०३% पर्यंत सर्वात कमी निधी व्यवस्थापन शुल्कासह हा एक अत्यंत किफायतशीर …

Read More »

प्रविण दरेकर यांचा इशारा,… अहंकारच तुमचा वैचारिक ऱ्हास करेल मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर

मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही, असे सणसणीत उपरोधिक टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, मी भंगार आहे कि अंगार आहे हे …

Read More »

भाजपाचा बृजभूषणला सल्ला विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या विरोधात टीका नको हरयाणा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दिला सल्ला

भाजपाने पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंह यांना ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हरयाणात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टीका करण्याचे टाळावे असा सल्लाही भाजपाच्या श्रेष्ठींनी दिली असल्याची माहिती पुढे आली. ऑलिंम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, उबाठाने….माफी मागावी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून शेलार यांची मागणी

उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. …

Read More »