Editor

नाना पटोले यांचे साकडे, महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे

आषाढी वारीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील …

Read More »

पूजा खेडकर यांची स्पष्टोक्ती, समितीसमोर सर्व आरोपांची उत्तरे देईन मिडीया ट्रायल सुरु आहे पण सत्य बाहेर येईलच

मानसिक आणि डोळ्याच्या आधारे अंपगत्व असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करत आणि कमी उत्पन्न असल्याचे दाखवित क्रिमीलेयरच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांकडून रोज नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच पूजा खेडकर हीच्या आईने शेतकऱ्याला पिस्तूल दाखवित धमकविल्याचे प्रकरणही उघडकीस आले आहे. त्यामुळे पूजा खेडकर …

Read More »

स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताला सामोरे जावे लागलंय पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत

देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नासाठी आलेल्या ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताच्या घटनेला सामोरे …

Read More »

पाकिस्तान सरकारकडून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षावर घातली बंदी शरीफ सरकारमधील मंत्री अत्ताउल्ला तरार यांची घोषणा

पाकिस्तान सरकारने १५ जुलै रोजी जाहीर केले की ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर देशविरोधी कारवायांमध्ये कथित सहभागाबद्दल आणि त्यांच्या दोन वरिष्ठ पक्षाच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली. “परकीय निधी प्रकरण, ९ मेची दंगल आणि सायफर प्रकरण तसेच अमेरिकेत मंजूर झालेला …

Read More »

आशिष शेलार यांचा पलटवार, श्रीमान मोरारजी राऊत संजय राऊत यांच्या लेखातील टीकेवर केला पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामनातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांचा “श्रीमान मोरारजी राऊत” असा उल्लेख करुन पलटवार केला. आमदार ॲड आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून या अग्रलेखाला प्रत्त्युतर देताना म्हणाले की, महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण …

Read More »

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे …

Read More »

अलका लांबा यांचे निर्देश, प्रत्येक बुथवर किमान एक महिला अध्यक्ष नियुक्त करा महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न

महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे, ही नारीशक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजयाचा मार्ग आखून दिला आहे. भारतीय जनता पक्षाने ४०० पारचा नारा दिला होता त्याला रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले असून …

Read More »

छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या घरी दाखलः तर्क वितर्कांना उधाण मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतल्याचा भुजबळ यांचा खुलासा

Chhagan Bhujbal Sharad Pawar

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडात अजित पवार यांची छगन भुजबळ यांनी साथ दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीसाठी व्यक्तीशः अजित पवार आणि इतर नेत्यांकडूनही टाळले जाते. त्यातच नुकताच अजित पवार पक्षाच्यावतीने बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान रॅलीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, परदेशातील गोळीबारावर बोलायला वेळ, पण मणिपूरवर नाही भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का ?

मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला …

Read More »