Editor

विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तू पुरवठा कंत्राटात ३३० कोटींचा घोटाळा घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा आंदोलन - मुंबई काँग्रेसचा इशारा !

महापालिका शाळांतील लाखों विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. साधारण ३३० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप माजी उपमहापौर अश्रफ आझमी, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, सुफियॉं वणू यांनी केला आहे. अद्यापही मुलांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत …

Read More »

अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडे, विकासाच्या वाटेवर नेण्याची … सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेव

बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींच्या तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून “राज्यात पाऊस पाणी चांगले होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊ दे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ दे, समाजातील एकजूट, …

Read More »

विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा: काँग्रेसची मागणी राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून …

Read More »

खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर: स्पर्धक विजेत्यांची यादी राज्य सरकारकडून राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहिर

राज्यात खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२३ …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी २५ जुलै रोजी यात्रेला सुरुवात

सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन २५ जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. २६ तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक आता महारेराच्या अध्यक्ष पदी अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सौनिक यांची नियुक्ती

राज्याचे माजी मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदी आज नियुक्ती करण्यात आली. महारेराचे माजी अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागेवर आता मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे जेष्ठ सनदी अधिकारी असून …

Read More »

पूजा खेडकर प्रकरणी नवे वळणः प्रशिक्षण राज्य सरकारने थांबविले मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राकडून सरकारला आदेश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ८३७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होत आयएएस पदासाठी निवड झालेल्या पूजा खेडकर हीची प्रशिक्षण कालावधीतच कारकिर्द वादग्रस्त बनली असून पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अखेर केंद्र सरकारच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राच्या आदेशान्वये राज्य सरकारने तिची जिल्हा प्रशासनाचे प्रशिक्षण थांबविण्याचे आदेश आज पारीत केले. पूजा …

Read More »

डोंबिवलीच्या बसला पनवेल जवळ अपघातः मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली भेट मध्यरात्री बस आणि ट्रॅक्टरचा झाला होता अपघात अनेकांचे प्राण वाचले

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील पनवेल नजीक दरम्यान डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या एका बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक लागून अपघात झाला. मात्र या अपघातात बस रस्त्यावरून काहीशी खोलगट असलेल्या भागात पडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंबीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली ४५ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, नांदेड जिल्ह्यातील कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »