Breaking News

आशिष शेलार यांची टीका,… ही यादी म्हणजे उबाठाच्या पराभवाची पहिली पायरी

एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उबाठाची आजची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उबाठा गटाची आज यादी जाहीर झाली त्यामध्ये …

Read More »

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरु होती. या चर्चेत काही काळ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही सहभागी झाली. मात्र वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडणे …

Read More »

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे

भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी २६ मार्च २०२४ रोजी लॉजिस्टिक उद्योगाच्या …

Read More »

शिवसेना उबाठा गटाने जाहिर केली १६ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीयस्तरावरील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने मात्र प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रादेशिक पक्षांनाचा प्राधान्यक्रम देत स्वतःच्या हिशाच्या जागा जाहिर केल्या. याच कृत्याची पुनरावृत्ती भाजपाने करत त्यांच्या पक्षाच्या हिश्याला येणाऱ्या जागांचे वाटप जाहिर केले. मात्र या दोन्ही काँग्रेस आणि भाजपाने स्थानिक पक्षांच्या राजकिय …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच …

Read More »

गॅस निर्माणासाठी वापरणाऱ्या कोळशाच्या किमती कमी ठेवा-निती आयोगाची सूचना केंद्र सरकारकडून याबाबतसकारात्मक

गॅससाठी पुरवल्या जाणाऱ्या कोळशाची किंमत वीज क्षेत्राला पुरवल्या जाणाऱ्या कोळशाच्या अधिसूचित किंमतीपेक्षा कमी ठेवली पाहिजे. सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील कोळसा गॅस प्रकल्पांच्या विकासकांच्या मनात निश्चितता निर्माण करण्यासाठी ते उत्खननाच्या आधारावर आकारले जाऊ शकते, NITI आयोगाने कोळसा गॅस प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सुचवले. बैठकीत उपस्थित असलेल्यांनुसार NITI …

Read More »

भारतीय आर्थिक स्थिती २०२५ मध्ये फारशी समाधानकारक राहणार नाही अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलचा अहवाल

आर्थिक परिस्थिती आर्थिक २०२४ मध्ये वाढीसाठी अनुकूल होती, विशेषत: बँक पत वाढ सलग दुस-या वर्षी दुहेरी अंकात असताना, क्रिसिलच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ च्या तुलनेत परिस्थिती कमी वाढीला आश्वासक असू शकते. नॉन-बँकांसाठी आणि असुरक्षित ग्राहक कर्जासाठी जोखीम वजन वाढवण्याच्या RBI च्या हालचालीमुळे पत वाढ कमी होण्याची अपेक्षा आहे. Crisil MI&A …

Read More »

लडाखच्या मुद्यावरून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करावा या मागणीसाठी उपोषणाच्या २१ व्या दिवशी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कमजोर दिसणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि सुधारणावादी सोनम वांगचुक यांनी २६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली. अमित शहा हे राजकारणी आहेत हे सिद्ध करतील. सोनम वांगचूक बोलताना …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु होती. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत काही घडामोडी घडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी बाबतची भूमिका जाहिर केली. …

Read More »

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …

Read More »