सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून दहशत….
चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सत्तेचा माज असल्याने हा राडा केला असून हा सत्तेचा माज जनताच उतरवेल. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार …
Read More »नोटीसांना प्रतिसाद नाहीः ईडीची अरविंद केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव
मागील काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सातत्याने ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून कथित मनी लॉंडरींगप्रकरणी चौकशीसाठी नोटीसा बजावण्यात येत आहेत. परंतु अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडीच्या समन्सला कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नाही की चौकशीसाठी ईडी कार्यालयातही जात नाहीत. त्यामुळे अखेर ईडीने दिल्लीच्या रोऊज अव्हेन्यू न्यायालयात …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्तीः आदीवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नाहीच
राज्यातील धनगर समाजाला आदीवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून करण्यात येत होती. तसेच या प्रश्नावर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आरक्षण लागू करू अशी घोषणा केली. इतकेच नव्हे तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकतानाही धनगर समाजालाही फक्त …
Read More »मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल, मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपलं कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने आज शासनास अहवाल सादर केला. त्यांनंतर मंत्री …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, … डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण
मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …
Read More »नायगाव दादर येथे २२ व २३ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचे आयोजन दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, ३ रा. मजला, शारदा मंगल कार्यालय, १७२, नायगाव, दादर (पूर्व) येथे होणार असून सर्वांसाठी प्रवेश …
Read More »काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात मंजूर केले “हे” दोन ठराव
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून विविधस्तरावर कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी कार्यकर्त्या-पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. काँग्रेसनेही आज कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन लोणावळ्यात केले. या शिबिरात काँग्रेसने दोन महत्वाचे ठराव मंजूर केले. त्यातील एक ठराव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार संग्राम थोपटे यांनी दुसरा मांडला. या …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल, एकजुटीने लढा व विजय मिळवा: रमेश चेन्नीथल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ …
Read More »७/१२ उताऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असे शेरे कमी करण्याचा निर्णय
पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्प, कुकडी व डिंभे प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प, निरा देवधर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव रायता पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणे या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना …
Read More »
Marathi e-Batmya