Breaking News

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून देण्याची मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. समृद्ध भारत फाउंडेशनच्यावतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी राष्ट्रीय परिषद …

Read More »

सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला

मराठी ई-बातम्या टीम सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख …

Read More »

अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान,” तर खुशाल अविश्वासदर्शक ठराव आणावा” अध्यक्ष निवडणूकीवरून विरोधकांच्या आरोपाला दिले उत्तर

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्ष पदासाठी सरकार आवाजी मतदानाने निवडणूक घेत असल्याने सरकारमध्ये अविश्वास असल्याचे वाटत असेल तर विरोधकांनी खुशाल विधिमंडळात अविश्वासदर्शक ठराव आणावा आणि तो मंजूर करून दाखवावा असे खुले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले. विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षाची निवडीवरून …

Read More »

सरकारी चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर मुख्यमंत्री न फिरकल्याने आदित्य ठाकरेंनाच मंत्र्यांकडून विचारणा

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारापणामुळे सरकारच्या दैंनदिन कामकाजातून बाजूला झालेले आहेत. मात्र किमान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी प्रथा आणि परंपरेनुसार मुख्यमंत्री हे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राज्याचे आणि सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारी चहापानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण …

Read More »

माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? पेपरफुटी तपासावरून नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन …

Read More »

धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपाने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत बीड जिल्ह्यातील आष्टी मधील १० देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनीत घोटाळा;भाजपच्या आमदारांचा समावेश...

मराठी ई-बातम्या टीम बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या… जमीनीही सोडल्या नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन …

Read More »

विधानसभा आणि विधान परिषदेत निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत २२ डिसेंबरपासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांसंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी …

Read More »

राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारव टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम निलंबित करण्याची गरज नसताना केवळ आवाज बंद करण्यासाठी आणि सरकार केव्हाही धोक्यात येऊ शकते, याची भीती असल्याने आमचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर करत राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू असल्याची खरमरीत टीका …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »

अॅमेनिया आजाराच्या समुळ उच्चाटनासाठी राज्य सरकार पुरविणार या पध्दतीचे तांदूळ गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर गुणसंवर्धीत तांदूळ वितरण प्रकल्प सुरू

मराठी ई-बातम्या टीम ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित …

Read More »