मराठी ई-बातम्या टीम डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काल लगेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रूग्ण आढळून आले. तर आज मुंबईतील दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल हाती आला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोन रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या ३७ वर्षिय व्यक्तीला …
Read More »कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीच्या दरात आणखी घटः असे राहणार दर खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णयः डेटा आणि आयोगाशिवाय आरक्षण नाही राज्य मंत्रिमंडळाच्या अध्यादेशाला स्थगिती
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत २७ टक्के आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला आणि त्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इम्पिरियल डेटा आणि आयोगाच्या शिफारसींशिवाय ओबीसी समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचा निकाल देत …
Read More »शेअर बाजारात कमाईची संधी; रेटगेन, श्रीराम प्रॉपर्टीजसह अनेक IPO येणार गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा संधी आयपीओ आणि शेअर बाजारातील गुंतवणूकीची
मराठी ई-बातम्या टीम गुंतवणूकदारांना या आठवड्यात शेअर बाजारातून पैसे कमावण्याची संधी मिळेल. या आठवड्यात अनेक IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) बाजारात सूचिबद्ध होणार आहेत. गुंतवणूकदारांना Ratgain Travel Technologies IPO, Shriram Properties IPO, Metro Brands IPO आणि MapMy India IPO मध्ये अर्ज करण्याची संधी मिळेल. या कंपन्या जगातील सर्वात मोठ्या वितरण तंत्रज्ञान …
Read More »या महिन्यातच तुमचे कारचे स्वप्न पूर्ण करा; या कंपन्यांच्या कार महागणार टाटा, होंडासह मारुतीच्या गाड्या पुढील महिन्यापासून किंमती वाढणार
मराठी ई-बातम्या टीम तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या अखेरीस ती खरेदी करा, कारण पुढील महिन्यात तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते. वाढत्या किमतीमुळे टाटा मोटर्स, Honda आणि Renault पुढील वर्षीच्या जानेवारी २०२२ च्या सुरुवातीला त्यांच्या कारच्या किमती वाढवू शकतात. याआधी, देशात सर्वाधिक कार विकणारी मारुती …
Read More »उमेदवारी अर्ज भरलाय? मग आता ही कागदपत्रे सादर करा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. राज्य …
Read More »इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ‘या’ ८ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा… आठ गोष्टींसाठी न केल्यास येऊ शकते नोटीस
मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे लागेल. आयटीआर भरताना तुमच्या उत्पन्नाची अचूक माहिती देणे आवश्यक आहे, अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. तुम्ही आयटीआर भरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. योग्य ITR फॉर्म निवडा आयकर विभागाने अनेक आयटीआर फॉर्म निर्धारित …
Read More »डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “शासनकर्ती जमात बनणे हेच उद्दिष्ट”: मग आजस्थिती काय ? महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम
‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. …
Read More »चिंता वाढली: राज्यात आणखी ओमायक्रॉनचे ७ रूग्ण सापडले पुण्यात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ जण आढळले
मराठी ई-बातम्या टीम काल डोंबिवलीत केपटाऊनमधून आलेल्या ३३ वर्षिय युवक ओमायक्रॉनबाधित आढळून आल्यानंतर आज पुणे येथील एकजण तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ असे एकूण सात जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून त्यांच्या अहवाल पुणे प्रयोगशाळेतून आज मिळाला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांची संख्या ८ वर पोहचली. मागील महिन्याच्या २४ नोव्हेंबर २०२१ रोजी …
Read More »परदेशी प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केले “हे” नवे नियम चाचणी निगेटीव्ह आल्यास दोन वेळा व्हावे लागणार क्वारंटाईन
मराठी ई-बातम्या टीम राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण काल डोंबिवलीत आढळून आल्यानंतर राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी नवे नियम जारी केले असून ते अंत्यत कडक स्वरूपाचे आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटीव्ह आली तरी दोन वेळा क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्याचा नियम आज नव्याने लागू करण्यात आला असून त्या …
Read More »
Marathi e-Batmya