Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी जागा घ्याव्यात १५ दिवसात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा

राज्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वसतिगृह काही ठिकाणी भाडे तत्त्वावरील जागेत आहेत. वसतिगृहांसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असेही यावेळी सांगितले. महसूल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पंतप्रधानांनी भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!

महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात  विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क संचलन मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय, अशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलन, मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य …

Read More »

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …

Read More »

रईस शेख यांची मागणी, वीज दरवाढ मागे घेवून यंत्रमाग व्यवसायाला पॅकेज द्या वीज सवलतीसाठी यंत्रमाग ऑनलाईन नोंदणीची सक्ती मागे घ्या

अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के कर लादल्याने कापडाची निर्यात ठप्प असून त्यात पुन्हा महावितरण कंपनीने वीजदरवाढ लादली आहे. यामुळे राज्यातील आर्थिक संकटात असलेला यंत्रमाग व्यवसाय मृत्युपंथाला लागेल, अशी भीती व्यक्त करत वीजदरवाढ मागे घ्यावी आणि यंत्रमाग व्यवसायाला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी …

Read More »

यंदाचा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार या तिघांना जाहिर आण्विक रचनेच्या सहाय्यातून वायू आणि रसायने वाहण्याची क्षमता

रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) जाहीर केले की, “धातू-सेंद्रिय चौकटींच्या विकासासाठी” सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येत आहे. २०२५ च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांनी मोठ्या जागांसह आण्विक रचना तयार केल्या आहेत ज्यातून वायू आणि इतर रसायने वाहू शकतात. …

Read More »

निर्मला सीतारामण म्हणाल्या, तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण होतेय ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ च्या ६ व्या कार्यक्रमात वक्तव्य

जलदपणे विकसित होत असलेल्या डिजिटल लँडस्केपमध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ च्या ६ व्या आवृत्तीत तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण करण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल पायाभूत सुविधांनी वाढत्या प्रमाणात आकार घेत असलेल्या जगात, नवोपक्रमाचे कधीही शस्त्रीकरण केले जाऊ नये. त्यांनी जागतिक भागधारकांना तांत्रिक प्रगतीच्या …

Read More »

६८% म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निष्क्रिय निधींमध्ये गुंतवणूक मालमत्ता ६.४ पटीने वाढलीः सर्व्हेक्षणात माहिती पुढे

मोतीलाल ओसवाल यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान ३,००० गुंतवणूकदारांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की ५५% गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षी त्यांच्या निष्क्रिय वाटपात वाढ केली आणि ७२% गुंतवणूकदारांनी या आर्थिक वर्षात ती आणखी वाढवण्याची योजना आखली आहे. गुंतवणूकदारांमध्ये दीर्घकालीन विश्वास असल्याचे लक्षणीय आहे – जवळजवळ ८५% गुंतवणूकदार तीन वर्षांपेक्षा जास्त …

Read More »