Breaking News

१९६७ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्याने आयआयटीला दिली १ कोटीची देणगी बक्षी ग्रुपकडून दिली देणगी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT दिल्ली) ला बक्षी ग्रुप ऑफ एंटरप्रायझेसचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमरजीत बक्षी यांच्याकडून एंडोमेंट फंडासाठी १ कोटी रुपयांची उदार देणगी मिळाली आहे. १९६७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी, बक्षी यांनी २०१७ मध्ये सुरू केलेल्या प्रतिज्ञाचा भाग म्हणून हे योगदान दिले. एका अधिकृत निवेदनानुसार, देणगीचा …

Read More »

अन्या पॉलिटेकचा आयपीओ ख्रिसमस नंतर बाजारात २६ डिसेंबर रोजी बाजारात उघडणार

अन्या पॉलिटेक अॅण्ड फर्टिलायझर Anya Polytech & Fertilizers, गुरूवार, २६ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी सार्वजनिक इश्यू उघडण्यासाठी सज्ज आहे आणि सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्याची बिडिंग विंडो बंद करेल. हा ताजा इश्यू, प्रत्येकी १३ ते १४ रुपये किंमतीच्या इक्विटी शेअर्सची ऑफर देत आहे, १०,००० शेअर्सपासून सुरू होणाऱ्या मोठ्या आकारासह. अन्या पॉलिटेक …

Read More »

संरक्षण विषयक तीन कंपन्यांचे स्टॉक तर विकत घेतले पाहिजेत एचएएल एलारा आणि भारत इलेक्ट्रीक्लस् कंपन्याचे शेअर्स खरेदी करा

एलारा सिक्युरिटीज Q4 (मार्च तिमाही) ऑर्डर प्रवाहावर मोठी सट्टेबाजी करत आहे कारण अलीकडील ऑर्डरिंग मंदी असूनही FY25 साठी संरक्षण भांडवली मूल्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्वदेशीकरण आणि निर्यातीच्या नेतृत्वाखाली भारताची संरक्षण कथा पुढील दशकात उलगडणार आहे, ब्रोकरेजने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा एचएएल (लक्ष्य किंमत: ५,४६५ रुपये) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड …

Read More »

पॉपकॉर्नवर जीएसटी लावणे पडले भारीः बाजारातून व्यक्त होतेय नाराजी तर सोशल मिडियावर निर्णयाची धट्टा

गुड्स अँड सर्व्हिसेस कौन्सिल अर्थात जीएसटी कौन्सिने अलीकडेच पॉपकॉर्न वर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने एक वेगळेच वादळ निर्माण झाले असून विविध प्रकारच्या पॉपकॉर्नवर विविध प्रकारचे कर आकारले जाणार आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर नवी मीम्सची मालिका सुरू झाली आहे, परंतु कर तज्ञांच्या मते अंमलबजावणी करणे कठीण …

Read More »

कुर्ला बस दुर्घटना प्रकऱण: आरोपी संजय मोरेचा जामीनासाठी अर्ज पोलिसांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागितला वेळ

कुर्ला परिसरात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अपघातामध्ये आपला कोणताही दोष नसल्याचा दावाही मोरे यांनी केला असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा अर्जातून केला आहे. या प्रकरणावर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार …

Read More »

मुलुंड न्यायालयात साप आढळल्याने एकच गोंधळ तासाभराच्या नाट्यानंतर कामकाज सुरळीत सुरू

मुलुंड न्यायालयातील न्यायदालनातील फायलींच्या ढिगाऱ्यावर साप आढळून आला आणि न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे मंगळवारी सुमारे तासभर न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाले होते. सर्पमित्रांनी सापाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर तासभर खोळंब्यानंतर न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत झाले. मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या २७ क्रमांकाच्या न्यायदालनात मंगळवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे कामकाज …

Read More »

राज्यातील या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनिल डिग्गीकर बेस्टचे महाव्यवस्थापक तर डॉ हर्षदीप कांबळे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी

राज्यातील १२ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यात काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील विभागाच्या प्रधान सचिव पदाची धुरा वाहत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे अतिरिक्त …

Read More »

तळीरामासाठी खुशखबरः नववर्षाचे स्वागत आता २४ तारखेपासूनच पहाटे पाच वाजेपर्यंत करा विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

तळीरामांसाठी राज्य सरकाने मोठा निर्णय घेतला असून नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्रीपासून ते पहाटेपर्यंत आता दारूची दुकाने-बिअरबार खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली १९७३ अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या …

Read More »

नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध

२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महाबळेश्वर आणि पाचगणी मधील समस्यांचा आढावा विविध विकासकामांसाठी महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगर परिषदांना निधी उपलब्ध करून देणार

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले असता त्यांनी आपल्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे …

Read More »