Breaking News

जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण २०२५ च्या सुरवातीला सुरु होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची माहिती

बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेचे काम आता वेग घेत असल्याचे दिसते आणि येत्या काही महिन्यांत ते स्थापन होण्याची अपेक्षा आहे. “जीएसटी अपील न्यायाधिकरण लवकरात लवकर कार्यान्वित होईल याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. हे वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या सुरुवातीला केले जाण्याची शक्यता आहे, “अद्ययावत …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणा-या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर …

Read More »

चहा आणि कॉफी संदर्भात आयसीएमआरचा महत्वाचा सल्ला

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला आहे, ज्यात निरोगी जीवनासोबत संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्यावर जोर दिला आहे. मार्गदर्शक तत्त्वांपैकी एकामध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखेसह वैद्यकीय पॅनेलने स्पष्ट केले की चहा आणि कॉफीचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती आहे, माहित आहे का? मग वाचा बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएम मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची चल संपत्ती आहे, त्यांच्याकडे ५२,९२० रुपये रोख आहेत आणि मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःची जमीन, घर किंवा कार नाही. प्रतिज्ञापत्र पुढे दाखवते की पीएम मोदींचे करपात्र उत्पन्न २०१८-१९ या …

Read More »

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणः खूनामागील हेतू आणि हत्या

विवेकवादी आणि अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोघांना पुण्यातील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी, ऑगस्ट २०१३ च्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळण्यास १० वर्षे लोटली हे खेदजनक आहे. या हत्येमागील कट सिद्ध करण्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अयशस्वी ठरल्याने मुख्य सूत्रधार …

Read More »

लोकसभेच्या चवथ्या टप्प्यात अजेंडा रहीत निवडणूक

लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी ९६ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यासह २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत, ३७९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे, ज्यात सोमवारी आंध्र प्रदेशातील सर्व २५ आणि तेलंगणातील सर्व १७ जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात एकाच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व १७५ …

Read More »

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची मागणी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा

घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे …

Read More »

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती ICU मध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत …

Read More »