आरोग्य

जे जे रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे …

Read More »

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही …

Read More »

Medical Expense : वैद्यकीय उपचारांचा खर्च ५ वर्षात झाला दुप्पट… महागाईत दरवर्षी १४% दराने वाढ

Medical Expense

एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर Medical Expense  उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. एकीकडे महागाई दर ७ टक्क्यांच्या …

Read More »

“टिबी मुक्त पंचायत” उपक्रमाचा रायगड जिल्ह्यापासून शुभारंभ क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक- आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार

राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबी मुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार …

Read More »

धर्मादाय रुग्णालयांची माहिती आता ‘आरोग्य आधार’ ॲपवर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत …

Read More »

आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही दोन दिवसात अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करणार

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा-कोपर येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिपत्याखालील महापालिकेच्या रूग्णालयातील मृत्यू प्रकरणाची चौकशी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची चौकशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकिय अधिपत्याखालील ठाणे महापालिकेवर त्यांच्याच गटाची सत्ता आहे. ठाणे येथील कोपर मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सदर मृत्यू प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राम बारोट यांनी १७ जणांच्या मृत्यूला त्यांची प्रकृती अवस्थ असल्याचे सांगत प्रशासनाची बाजू लावून धरली …

Read More »

ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित

उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या …

Read More »

सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ १५ ऑगस्ट पासून अंमलबजावणी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची घोषणा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध …

Read More »

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयींना प्रतिबंध करा आरोग्य विभागाचे आवाहन

राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग …

Read More »