संजय राऊत यांना धमकी, सिध्दू मुसेवाला प्रमाणे… एके ४७ ने हत्या करण्याची दिली धमकी

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका गुंडामार्फत हल्ला करण्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून दिली होती. त्यानंतर काल शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारात संजय राऊत यांना एसएमएसवरून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून दिल्लीत एके-४७ ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला असून त्यात एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती कळवताच जलदगतीने तपास सुरु करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज पाठवला जात असल्याचं त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गेल्या महिन्यातच संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे. सरकार या सगळ्या धमकी प्रकरणाला गांभीर्याने न घेता ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली, ती चुकीचीच होती. संजय राऊत या सगळ्याच्या विरोधात तीव्र लढा देत आहेत. त्यामुळेच अशा धमक्या येत आहेत. सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

संजय राऊत यांना आलेला धमकीचा हाच तो एसएमएसः

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *