न्यायालयात खटल्यादरम्यान, मौन, शांतता राखण्यास सांगितल्याबद्दल न्यायालयीन शिपायाला एका सरकारी अधिकारी आणि वकिलाने धमकावून आक्षेपार्ह टिपण्णीही केली. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि न्यायालयीन शिपाईला शिवीगाळ केल्याबद्दल तथा न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया दडवल्याबद्दल दोघांनाही माफीनामा देण्याचे आदेश दिले. दोघांकडून बिनशर्त माफीनामा देण्यात आल्यानंतर दोघांनाही आपल्या कर्तव्याची आठवण करून देऊन न्यायालयाने त्यांचा माफीनामा स्वीकारला.
सरकारी अधिकारीमयूर गुलाबराव पाटील आणि आणि वकील अदिनेश निंबा कदम या दोघांनाही भविष्यात सावधगिरी बाळगण्याची आणि राज्यातील कोणत्याही न्यायालयाच्या न्यायदालनात अशी कृत्ये करू नयेत, असे आदेशही न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने दोघांचाही माफीनामा स्वीकारताना आदेशात नमूद केले.
काय आहे प्रकरण
एका महापालिकेशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी सुरु असताना न्यायदालनात मोठ्या संख्येने वकील, पक्षकार उपस्थित होते. न्यायदालनाबाहेर गोँगाट ऐकू येत असल्याने नेहमीनुसार, शिपाईअतुल तायडे यांनी वकिल आणि उपस्थित अधिकाऱ्यांना शांतता राखण्यास सांगितले. त्यावर, अधिवक्ता दिनेश कदम यांच्यासह अधिकारी मयूर पाटील यांनी तायडे अश्लिल भाषेत शिवीगाळ करून मारण्याची तसेच त्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करून संध्याकाळपर्यंत त्यांची सेवा समाप्त होईल, अशी धमकीही दिली. सदर बाब तायडे यांनी न्या. गडकरी यांच्या कानावर घातली असता न्यायालयाने कदम आणि पाटील या दोघांनाही जाब विचारला. त्यावर अँड. कदम यांनी आपली बाजू योग्य कशी ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही न्यायालयाने दिलेल्या आदेशाला चुकीचे ठरवत असून न्यायालयीन कर्मचाऱ्याला धमकावत आहात. याकृतीचे तुम्ही समर्थन करती आहात का?, अशा वागणूकीमुळे आम्ही तुमची सनद रद्द करू शकतो, अशा शब्दात न्यायालयाने सुनावले. न्यायालयाच्या वाढत्या नाराजीवरून ज्येष्ठ अँड. राम आपटे आणि अँड.सुभाष झा यांनी हस्तक्षेप करून कठोर कारवाईमुळे कदम यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला हानी पोहोचू शकते, म्हणून न्यायालयाला सौम्यता दाखवावी, अशी विनंतीही केली. त्यावर सरकारी अधिकारी आणि वकीलाने न्यायालयाचीच नव्हे तर शिपायाचीही, संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत वैयक्तिक शपथपत्र सादर कऱण्याचे आदेश दिले
न्यायालयाचा शिरस्ता
खटल्यादरम्यान न्यायालयात अथवा बाहेरही पिन ड्राँप शांतता बाळगावी, असा न्या. अजय गडकरी यांच्या न्यायालय क्र. ५३ चा शिरस्ता आहे. कोणाकडूनही शांतताभंग होणार नाही, यासाठी न्यायदालनातील कर्मचारी, बाहेरील पोलीस कर्मचारी ज्येष्ठ, वरीष्ठ वकील, पक्षकार, सामान्य नागरिक, पत्रकार यांना वेळोवेळी शांतता राखण्याचे आवाहन करीत असतात.
शिपायाला दिलेल्या धमकीप्रकरणी न्यायालयाने दिलेला निकालाची प्रत-

Marathi e-Batmya