युवा पिढीला व्यसनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान राबविण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक बैठक आज पुणे येथे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे गृह विभागाचे …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने धमकी, १०० कोटी द्या, अन्यथा.. नागपूर पोलिस आणि सायबर सेलकडून वेगाने तपास सुरु
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करत १०० कोटी रूपये द्या अन्यथा घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात …
Read More »चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद …
Read More »नाशिक शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जणांचा मृत्यूः मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, अपघाताच्या चौकशीचे निर्देश
मुंबईहून शिर्डीला चाललेल्या भाविकांच्या खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर ध़डक होऊन झालेल्या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. हा अपघात नाशिक- शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झाला. अपघात झालेल्या मार्गावर दुभाजक असतानाही खाजगी बस आणि ट्रक आमने-सामने कसे आले असा प्रश्न निर्माण झाला …
Read More »मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या मेट्रोची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणीः काय आहेत वैशिष्टे मेट्रो ७, मेट्रो २अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल-मुख्यमंत्री
मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांसाठी डबलडेकर टनेल मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत चर्चा
वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात …
Read More »मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाहनचालकांसाठी या ७ नवीन सेवांचे लोकार्पण राज्य रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन
रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, एमटीएचएल मार्ग नोव्हेंबरपासून खुला होणार एमटीएचएलचे काम ९० टक्के पूर्णः एमटीएचएल ठरणार देशातील पहिला ओपन रोड टोलिंग महामार्ग
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रांस हार्बर …
Read More »५० अंगणवाड्या दत्तक देण्यासाठी ‘या’ विविध संस्थांशी सामंजस्य करार अंगणवाड्यांच्या बळकटीकरणावर शासनाचा भर- मंत्री मंगलप्रभात लोढा
लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी केंद्र दत्तक देवून अंगणवाडी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू …
Read More »आता सर्व शासकिय पत्रांवर बोधचिन्हाबरोबर राहणार “जनहिताय सर्वदा” घोषवाक्य घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे …
Read More »
Marathi e-Batmya