मुंबई

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता दर जैसे थे

आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …

Read More »

प्रेयसीच्या आत्महत्येचा तपास नीट होत नसल्याने प्रियकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्याने आष्टी येथील प्रौढाचा प्रयत्न

प्रेयसीने केलेल्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून नीट होत नसल्याचे गाऱ्हाणे घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेला होता. मात्र तेथे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसल्याने अखेर या प्रियकराने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात आल्याने सदर व्यक्तीला कोणत्याही पध्दतीची फारशी …

Read More »

वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू..

वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर …

Read More »

उच्च न्यायालयाची विचारणा, अवमान केल्याप्रकरणी दंड का ठोठावू नये?

न्यायालयाने आदेश देऊनही नगरविकास विभागाने आरक्षण बदलाचे नोटीफिकेश काढले नाही. त्यामुळे दाखल केलेल्या अवमान याचिकेप्रकरणी तुम्हाला दंड का ठोठावू नये असा सवाल करत तीन नोटीफिकेश काढा अन्यथा प्रधान सचिवांना हजर करा असा सज्जड दमच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. राज्य सरकारने केलेल्या बदलीमुळे न्यायालयाने नव्या प्रधान सचिवांना तूर्तास दिलासा …

Read More »

२७ लाख रूपये किंमतीचा कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त

दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल …

Read More »

जितेंद्र आव्हाडांना आधी १४ दिवसांची कोठडी आणि जामीन

साधारण मागील आठवड्यात हर हर महादेव या मराठी चित्रपटात शिवकालीन इतिहासात मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमध्ये जात या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच तेथील एका प्रेक्षकाला मारहाणीचा एक व्हिडिओही प्रसारीत झाला. त्यानंतर आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना काल संध्याकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली. …

Read More »

मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

हर हर महादेव या सिनेमाचा शो बंद करताना एका प्रेक्षकास ठाण्यातील मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान मला नोटीस घेण्यासाठी बोलवून बेकायदा अटक केली असा आरोप आव्हाड यांनी केला. हर हर महादेव या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविल्याचा आरोप करत …

Read More »

मुंबई-पुण्याला जोडणारी मिसींग लिंक २०२३ मध्ये पूर्ण होणार

जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ देशातील पथदर्शी प्रकल्प ठरणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील …

Read More »

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार बदलले आता मुंबई ही बदलणार

मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात  केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते …

Read More »