मागील एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढल्याच्या घटना घडल्या असून अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे …
Read More »सदावर्ते म्हणाले, आमची लढाई विना दारू-मटण आणि पैशाची पण… एसटी बँकेच्या निवडणूकीत सदावर्तेंचे पॅनल उभारणार
एसटी विलनीकरणाच्या मागणीवरून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुकले. मात्र पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना १८ दिवसांचा पोलिस तुरूंगवास आणि गुन्हे महाराष्ट्र दौऱा केल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान देत एसटी महामंडळ कर्मचारी बँकेच्या निवडणूकीत आपले पॅनल उभारणार असल्याची …
Read More »मुंबई काँग्रेस म्हणते, सर्व आगामी निवडणुकांमध्ये EVM मशीन ऐवजी Ballot Paper चा वापर करा भाई जगताप यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशभरातून सुमारे १९ लाख EVM मशिन्स गायब झाल्या आहेत. त्यातील ९ लाख ६० हजार मशिन्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) व ९ लाख ३० हजार मशिन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) च्या होत्या. या गायब झालेल्या EVM मशिन्स अजूनही मिळालेल्या नाहीत. …
Read More »तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं
हनुमान चालिसावरू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याप्रकरणी तब्बल १२ दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेले अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. १५ वर्षानंतर यांना मी रहात असलेली इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची टीका आमदार रवि राणा यांनी करत आता मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर …
Read More »राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपत्र वॉरंट २००८ मधील प्रकरणी परळीतील न्यायालयाने वॉरंट बजावले
भोंग्याच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांना न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावित न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे हे अजामीपात्र वॉरंट एका त्यांना २००८ मधील प्रकरणी आहे. त्यामुळे राज यांच्या …
Read More »राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यात अखेर जामीन मंजूर चौकशीला २४ तास आधी नोटीस द्यावी
हनुमान चालिसा म्हणण्यावरून अमरावतीच्या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासमोर जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच पोलिसांनी नोटीस बजाविल्यानंतरही राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराकडे जाण्याचा हट्ट धरल्याने राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज अखेर राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर मुंबई विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. …
Read More »अन्न व औषध प्रशासनाने केली अॅमेझॉनवर या कारणासाठी कारवाई गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री केली म्हणून कार्यवाही
इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल वर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रीस्क्रीपशन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in ) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्राँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते.या औषधाची मागणी amazon.in द्वारे …
Read More »राज्यातील कौशल्य विकासविषयक योजनांचे जागतिक बँक, केंद्राकडून कौतुक कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला प्रतिनिधींची भेट
संकल्प प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेमार्फत नुकतीच ७ सदस्यांनी राज्याला भेट दिली. राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून त्यांना विविध योजनांची माहिती दिली. …
Read More »राणा दाम्पत्याला तुर्तास दिलासा नाही, बुधवार पर्यंत तुरुंगातच वेळ संपत आल्याने न्यायालयाने सांगितले बुधवारी निर्णय देणार
मागील १० दिवसांपासून हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे तुरुंगात आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आजही न्यायालयालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी बुधवारी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळू शकला नाही. गेल्या …
Read More »सरकारी वकील अॅड. घरत म्हणाले, राणा दाम्पत्य बाहेर आले तर परिस्थिती बिघडेल न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्या घरासमोर जाऊन म्हणण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी राणा दांम्पत्यांवर राजद्रोहासह दोन गटात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जवळपास मागील आठवड्याभरापासून राणा दांमत्य पोलिस कोठडीत आहेत. सदरप्रकरणी जामीन मिळावा यासाठी त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya