मुंबई

आता आठवड्यातील फक्त दोनच दिवस भाजीपाल्याची दुकाने मुंबई महापालिकेकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडा अशी विनंती करूनही अनेकजण भाजीपाला-फळे खरेदीच्या निमित्ताने घराबाहेरच राहुन गर्दी करत आहेत. त्यामुळे या वाढणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्याच्या अनुषंगाने इथून पुढे आढवड्यातील दोनच दिवस भाजीपाला-फळभाजा खरेदीसाठी दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जारी केला …

Read More »

खोट्या बातम्या आणि अफवा प्रकरणी २४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे राज्याचे सायबर अधिक्षक बालासिंग राजपूत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आपतकालीन कायदा लागू केलेल्या असतानाही काहीजणांकडून कोरोना आजाराच्या अनुषंगाने खोट्या बातम्या, अफवा आणि एखाद्या समाजाविषयी तिरस्कार युक्त प्रक्षोभक साहित्य प्रसारीत केल्याप्रकरणी मागील २४ तासात २० जणांच्या विरोधात सायबर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाचे अधिक्षक बालासिंग राजपूत यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी …

Read More »

वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांना हलविण्यात यश पोद्दार हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले

मुंबई: प्रतिनिधी शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून युध्दपातळीवर प्रयत्न करत असतानाच मुंबईतील ऐन मध्यवर्तीभागातील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे १० रूग्ण सापडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला मोठ्या मेहनतीने यश आले. वरळी कोळीवड्यात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच या …

Read More »

तर विद्यार्थी कार्यकर्त्ये सरकारसाठी स्वंयसेवक म्हणून काम करतील छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी जाहीर केली. तरीही संचारबंदीत अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरीकांकडून गर्दी करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच पोहोचवण्यासाठी मुंबई छात्रभारतीचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणुन काम करायला तयार असल्याबाबतचे पत्र मुंबई छात्रभारती संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीले आहे. …

Read More »

कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईतल्या १० लाख झोपडीधारकांसाठी हवेचे इमले पहिल्याच आठवड्यात बंगल्यातील बैठकीत मंत्र्यांनी घेतला निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकारने १५ मार्चपासून लॉकडाऊन करण्याची तयारी सुरु केली. तसेच यासंदर्भात १९ मार्चला अधिकृत आदेशही जारी केले. मात्र विकासकांचे कैवारी म्हणून वावरत असलेल्या एका मंत्र्याने मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी फक्त हवेतल्या इमल्यांची तर विकासकांना दिर्घकालीन मलिद्याची व्यवस्था करणारा निर्णय २० मार्च …

Read More »

राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील. मुख्य सचिव …

Read More »

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …

Read More »

कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरण कक्षासाठी आदर्श बिल्डींग? रूग्णालयांच्या जागा कमी पडत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या रूग्णांच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यानाही या आजाराची लागण होत असल्याने विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी खाजगी हॉटेलची मदत घेण्यात येत आहे. मात्र सरकारच्या जमीनीवर उभ्या असलेल्या ३१ मजली आदर्श इमारतीचा वापर सरकारकडून का करण्यात येत …

Read More »

पनवेलमध्ये सर्व बंद तर ठाण्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय

पनवेलः प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पनवेल महापालिकेने शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ठाणे जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मीरा भाईंदर येथील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय या तिन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी आज घेतला. पनवेलमधील अत्यावश्यक …

Read More »

सरकार स्वतःहून निर्णय घेवू शकते, मात्र मुंबईकरांनाे घराबाहेर पडणे टाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणात गर्दी ओसरली आहे. त्यापेक्षा आणखी कमी झाली पाहिजे मी म्हणतो की बंदच झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडत लोकल, बसेस आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेवू शकते मात्र नागरिकांनी स्वतःहूनच …

Read More »