नगरविकासच्या मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता राजशिष्टाचार विभाग ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या महत्वाच्या विभागाचे प्रधान सचिव असलेल्या मनीषा म्हैसकर-पाटणकर यांची आज बदली करण्यात आली असून त्यांची रवानगी आयएएस अधिकाऱ्यांसाठी शिक्षेचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज शिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली. त्यांच्यासह आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या.
जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक यांची नियुक्ती आता अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे करण्यात आली.
एम डी पाठक प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-2 या पदावर करण्यात आली.
डी एम मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी परभणी या पदावर करण्यात आली.
डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण या पदावर करण्यात आली.
सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर करण्यात आली.
सी.के. डांगे सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती महापालिका आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका या पदावर करण्यात आली.
एम. देवेन्‍द्र सिंह महापालिका आयुक्त लातूर महानगरपालिका लातूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी यवतमाळ या पदावर करण्यात आली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *