मुंबई

कोंकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी एमटीडीसी आणि निसर्गयात्री संस्था यांच्यात सामंजस्य करार जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम

जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला. संयुक्त राष्ट्र पर्यटन (UN Tourism) संस्थे अंतर्गत …

Read More »

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. अटी व बंधने · परवानगी …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आदेश, पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा प्रकल्पाला गती देण्याचे आदेश

वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे जुहू गल्लीतील भूखंड घोटाळ्यावरील चर्चेचे शेलारांना आव्हान आशिष शेलारांनी वेळ व ठिकाण सांगावे, सरकारचे पाप लपविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करू नका

जुहू गल्ली येथील बीएमसीच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने, शासन आणि बीएमसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला भेट चढवल्याचा महाघोटाळा मुंबई काँग्रेसने उघडकीस आणल्या नंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांनी मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे व अर्थहीन आरोप केले …

Read More »

दीड लाख अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देणार मराठवाड्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देणार एक दिवसाचा पगार

राज्यात मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे आणि दुर्गा महिला मंच अध्यक्षा …

Read More »

अंधेरीतील पटेल नगर मध्ये म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भुखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमीं देवेंद्र फडणवीस होते. अंधेरी (पश्चिम) येथील या भुखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. …

Read More »

मंत्रिमंडळाचा निर्णयः बेकायदेशीर जाहिरात फलक प्रकरणी एका महिन्यात कारवाईचे आदेश घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल स्विकारला

मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास. तसेच समितीचे निष्कर्ष, व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी

वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले. …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांच्या बिल्डर मित्रावर सरकार मेहरबान जुहूचा ८०० कोटींचा महापालिकेचा भूखंड बिल्डरच्या घशात

देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए …

Read More »

दहावी आणि बारावी परीक्षा अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ खाजगी विद्यार्थी नाव नोंदणीसाठी मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र …

Read More »