पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बटेंगे… चा पुढचा नारा “एक है तो सेफ है” धुळ्याच्या प्रचार सभेत दिला नारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. परंतु धुळ्यातील पहिल्याच जाहिरसभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत पुन्हा एकदा हिंदू मतांचे धुव्रीकरणाच्या धर्तीवर पुढचा नारा देत एक है तो सेफ है चा नारा दिला. त्यामुळे लोकसभा निवडणूकीतील विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न राज्याच्या विधानसभा निवडणूकीत महायुती आणि भाजपाने पुन्हा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट होत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी बोलताना विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा विशिष्ट समुदायाची भीती दाखवत एक है तो सेफ है चा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जनजाती आणि आदीवासी समाजातील लोकांना एकमेकांविरोधात लढविण्याचे आणि त्यांची ओळख पुसून टाकण्याचे षडयंत्र काँग्रेसचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून देशातील ओबीसी आणि आदिवासी समुदायात भांडण लावण्याचे आणि त्यांच्यात फूट पाडण्याचे काम सुरु केले आहे. यापूर्वी देशात दोन धर्मियात अशी फूट पाडण्याचे राजकारण केल्यामुळेच देशाचे विभाजन यापूर्वी काँग्रेसमुळे केल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या या खतरनाक षढयंत्राला पराभूत करायचे आहे. जर काँग्रेसच्या फूट पाडण्याला रोखणे गरजेचे आहे. जर आपण एक नाही झालो तर आपली सुरक्षितता धोक्यात येईल. त्यामुळे एक आहोत तर सुरक्षित आहोत असा नाराही यावेळी मोदी यांनी दिला.

दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिम मधील प्रचारसभेत बोलताना एक सूचक वक्तव्य करत जेव्हा आम्ही विभागलो गेलो होतो, तेव्हा आम्ही कापलो गेलो होतो. परंतु आता आपणा सर्वांना हमे बटना नही है, आणि कटना भी नही है. त्यामुळे विभागायचे नाही तरच आपण सुरक्षित राहु असे सांगत बटेंगे तो कटेंगे असे जाहिर वक्तव्य केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेच्या पुढील टप्पा हा नरेंद्र मोदी यांनी आज पुर्ण करत एक है तो सेफ है असे सांगत एकप्रकारे पुन्हा हिंदू मतांच्या धुव्रीकरणाचा प्रयत्न भाषणातून सुरु केला आहे.

 

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *