कथित दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सक्तवसुली अंमलबजावणी अर्थात ईडीने कारवाई करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पर्यंतचा जामिन मंजूर केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी उद्या १ तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना तिहारच्या तुरुंगात शरण जावे लागणार आहे. मात्र काही काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांनी जामीनाचा कालावधी वाढवून मिळावा यासाठ प्रयत्न करत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी स्पष्ट निकाल न दिल्याने अखेर अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा तुरुंगात शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी आज एक व्हिडिओ जारी केला.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की ते आता रद्द करण्यात आलेल्या दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २ जून (रविवार) रोजी तिहार तुरुंगात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतील. १० मे पासून अंतरिम जामिनावर बाहेर असलेले केजरीवाल म्हणाले की, डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या शरीरात “गंभीर आजाराची” काही चिन्हे असू शकतात.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आपल्याला किती काळ तुरुंगात ठेवले जाईल याची कल्पना नाही. “देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी” पुन्हा एकदा तुरुंगात परत जाणार आहे. आपली भावना शुद्ध असल्याचेही यावेळी सांगितले.
भाजपावर निशाणा साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले, त्यांनी मला अनेक प्रकारे आपणाला तोडण्याचा प्रयत्न केला, मला गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत. मी तुरुंगात असताना त्यांनी माझा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी माझी औषधे बंद केली. या लोकांना काय हवे होते ते माहित नाही त्यांनी असे का केले? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो तेव्हा माझे वजन ७० किलो होते. आज ते ६४ किलो आहे. तुरुंगातून सुटल्यानंतरही माझे वजन वाढत नाही. हे शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते, असे डॉक्टर सांगत आहेत. त्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतील, असेही यावेळी सांगितले.
अरविंद केजरीवाल पुढे बोलताना भाजपाचे नाव न घेता म्हणाले की, तुरुंगात परतल्यानंतर ते आपल्याला त्रास देण्याचा” प्रयत्न करतील पण आपण झुकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मला निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अवधी दिला होता. परवा मी तिहार तुरुंगात परत जाईन. मी दुपारी ३ च्या सुमारास आत्मसमर्पण करण्यासाठी घरातून बाहेर पडेन. यावेळी ते माझ्यावर अत्याचार करतील अशी शक्यता आहे. पण मी कुठेही राहो, आत किंवा बाहेर मी झुकणार नाही, असेही यावेळी संगितले.
दिल्लीतील जनतेला उद्देशून अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुमची मोफत वीज, मोहल्ला दवाखाने, रुग्णालये, मोफत औषधे, उपचार, २४ तास वीज आणि इतर अनेक गोष्टी सुरूच राहतील. परतल्यानंतर आम्ही दिल्लीतील प्रत्येक आई आणि बहिणीला दरमहा १,००० रुपये देण्यास सुरुवात करू, असे आश्वासनही यावेळी दिले.
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझे आई-वडील खूप वृद्ध आहेत. माझी आई खूप आजारी आहे. मी तुरुंगात तिची खूप काळजी करेन. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहनही यावेळी केले. .
मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल १० मे रोजी तिहार तुरुंगातून बाहेर पडले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्याच्या दोन दिवस आधी २ जूनपर्यंत त्यांना शरण येण्यास सांगण्यात आले आहे.
https://x.com/ArvindKejriwal/status/1796429193212727348
Marathi e-Batmya