विधानसभा निवडणुकः वाढलेल्या ७६ लाख मतांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या याचिके संदर्भात याचिकेवर अंतिम निकाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत आक्षेप नोंदवित वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात आपली तीव्र भूमिका मांडली आहे. यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व इतर विरोधी पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम वापर तसेच १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या संशोधनाविरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असेही नमूद केले होते की, ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त ‘चूक’ नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

याचिकाकर्ता चेतन अहिरे यांचा आरोप आहे की, मतदान संपल्यानंतर आकस्मिकरीत्या ७६ लाख मतांची नोंद झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही. या प्रकरणी निवडणूक आयोग, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत

नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *