मागील काही महिन्यापासून मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ओबीसी नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झडत होत्या. त्यातच बीडमध्ये ओबीसींची मेळावा घेण्याची घोषणा केली होती. या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी इशारा दिला की, आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर देणं गरजेचे असल्याचे सांगत इशाराही यावेळी दिला.
छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या ओबीसी मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे. ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज आहे. पण आपल्याकडे ३७४ जाती आणि समाज आहेत. यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि जर बोलायला वेळ दिला तर इथेच रात्र होईल असंही सांगितले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आता अनेक लोकं म्हणतात की आम्हाला बोलू दिलं नाही, काही म्हणतात आमचा फोटो बँनरवर लावला नाही. आम्हाला मेळाव्याला बोलावलं नाही. पण मला त्यांना सांगायचं आहे की, अधिकार की लढाई मे निमंत्रण भेजे नही जाते जिनका जमीर जिंदा है, ओ खुद समर्थन मे आ जाते है अशी शेरो शायरी करत आपल्या हक्कावर गदा आल्यास टक्कर देणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
शेवटी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मेळाव्यात काही लोक घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असंही ऐकलं आहे की काहीजण सुतळी बॉंम्ब घेऊन आले आहेत. ते काही तरी गडबड करतील पण त्यांना तेथेच दाबायचं आणि पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कुणीही इकडे आणि तिकडे पहायचं नाही. शांततेत आपले लोक काय सांगतात ते ऐकायचं. त्यामुळे आपल्या नेत्यांनी देखील कमीत कमी शब्दात व्यक्त व्हायचे असल्याची आठवणही यावेळी करुन दिली.
Marathi e-Batmya