पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे केले कौतुक चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप

मुंबई: प्रतिनिधी
राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेषत: अजित पवार हे चांगले चांगले काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारीही चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारत त्यांचे कौतुक केले.
समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी या सर्व मंत्र्यांचा नावाने उल्लेख करून त्यांचे कौतुक केले.
राज्यातील गरजू आणि स्थलांतरीत कामगारांना अन्नधान्याचा पुरवठा वेळेत व्हावा आणि त्यांना अन्न धान्याची कमतरता भासू नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री चांगले काम करत आहेत. याशिवाय राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *