Breaking News

राज्यसभेच्या १२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या महाराष्ट्रातील जागांसाठी मतदान

देशभरातील विविध राज्यातून रिक्त होणाऱ्या १२ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडूण गेल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही मुंबईतून लोकसभेवर निवडूण गेल्याने त्यांचीही राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे.

या रिक्त झालेल्या जागांसाठी आणि बिहार, आसाम, हरयाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिसातून राज्यसभेवर गेलेल्यांचे सदस्यांची एक तर मुदत पूर्ण झाली आहे किंवा यातील काहीजण लोकसभेवर निवडूण गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

राजस्थानातून काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, हे ही लोकसभेवर निवडूण गेलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिंया हे ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत निवडूण गेलेले आहेत. याशिवाय सर्बानंद सोनवाल, कामाख्या प्रसाद तासा, मिसा भारती, दिपेंदर सिंग हुडा, विवेक ठाकूर, बिप्लब कुमार देब, डॉ केशवा राव आणि ममता मोहंता यांच्याशी जागा रिक्त होत आहेत.

राज्यसभेच्या या १२ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि मतदानाचा कार्यक्रम पुढील प्रमाणेः-

राज्यसभेच्या १२ जागांकरीता १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जाहिर होणार आहे.

२१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार

२२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जाची छानणी होणार

आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरा राज्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख २६ ऑगस्ट, तर बिहार, हरयाणा, राजस्थान, तेलंगणा, ओडिसा राज्यातील उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख २७ ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.

या १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम- रिक्त झालेल्या जागा-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत