जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण, ‘ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही’ 'कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल'

सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. त्या बाईटमध्ये पत्रकार खोदून विचारतो मग ते उत्तर देतात. आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर मला आवश्यकता वाटत नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांच्या वक्तव्यावर दिले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्र व्यवहार सुरू आहे हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक आहे वाझे यांनी काय लिहिले ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील याचा मला विश्वास आहे.

वाझे यांच्या मुलाखतीवर प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले की, दोन वर्षे माणूस शांत असतो अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते हा काही योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खुश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल अशी शंकाही यावेळी उपस्थित करत निवडणूक आहे त्यामुळे काही लोकांनी साम दाम दंड भेद वापरायचे ठरवलेले दिसतंय. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहितं, कुणाच्या सांगण्यावरून लिहितंय हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. जनता योग्य उत्तर देईल असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोणी जर सचिन वाझेला प्रवक्ता करत असेल तर काही लोकांची परिस्थिती आणखी बिकट होईल, एवढ्या खालच्या पातळीवर जावू नका, एवढीच त्यांना सुचना असे म्हणत नाव न घेता भाजपाला टोला लगावला.

About Editor

Check Also

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त, १९२ व्यक्तींना अटक

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *