परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याशी संबध नाही ऑपरेशन सिंदूर प्रश्नी ट्रम्प यांच्या दाव्यावर विरोधकांच्या मागणीवर स्पष्ट

संसदेच्या अधिवेशनाला आज सकाळी पुन्हा एकदा सुरुवात झाली. यावेळी विरोधकांच्या मागणीप्रमाणे ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ ते २६ वेळा भारत-पाकिस्तानचे युद्ध थांबविल्याबाबतचे दावा केला. त्यावरील केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसचे उपनेते तरूण गोगाई यांनी या प्रस्तावावर बोलताना केली. त्यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरही सरकारची भूमिका संसदेत मांडली.

यावेळी बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लोकसभेत बोलताना म्हणाले की, पाकिस्तानशी संघर्ष सुरू असताना भारत आणि अमेरिकेतील चर्चेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर व्यापाराशी कोणताही संबंध नव्हता – अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्यासाठी व्यापाराचा वापर केल्याचे वारंवार केलेले दावे फेटाळून लावले.

लोकसभेत बोलताना डॉ एस जयशंकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, २२ एप्रिल (पहलगाम दहशतवादी हल्ला) आणि १७ जून (भारत-पाकिस्तान युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त काळ) दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नसल्याचेही यावेळी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेतील चर्चेवर प्रकाश टाकताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता – ज्यावर मोदींनी उत्तर दिले की भारत आणखी जोरदार प्रत्युत्तर देईल.

त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी सांगितले की, ९ आणि १० मे रोजी भारताने पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, १० मे रोजी अनेक देशांनी भारताशी संपर्क साधला आणि नवी दिल्लीला कळवले की, पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारताने सर्व देशांना हे स्पष्ट केले की, पाकिस्तानकडून युद्धबंदीची चर्चा जर डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) चॅनेलद्वारे झाली तरच ती विचारात घेतली जाईल.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापार हा भाग नव्हता या डॉ एस जयशंकर यांच्या विधानाचा विरोधकांनी निषेध करण्यास सुरुवात करताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला आणि म्हटले की, विरोधी पक्षांनी त्यांच्याच परराष्ट्रमंत्र्यांना हटवण्यास तत्परता दाखवली, पण त्यांना दुसऱ्या देशावर विश्वास आहे.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, माझा आक्षेप आहे की त्यांना (विरोधी पक्षाला) भारतीय परराष्ट्र मंत्र्यांवर विश्वास नाही. मी त्यांच्या पक्षात परराष्ट्र खात्याचे महत्त्व समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाच्या सर्व गोष्टी येथे सभागृहात लादल्या पाहिजेत. हेच कारण आहे की ते तिथे (विरोधी पक्षाच्या बाकांवर) बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसतील, अशी टीकाही यावेळी विरोधकांवर केली.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *