नाणार प्रश्नी प्रस्ताव काँग्रेसचा मात्र गोंधळ शिवसेनेचा सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने विरोध दाखविण्यास सुरुवात केला. तरी या प्रकल्पाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विधानसभेत आणला नाही. परंतु या प्रकल्पाच्या अनुषंगाने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी प्रस्ताव मांडताच शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार प्रकल्पाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

विरोधकांच्या २९३ वरील प्रस्तावावर सरकारकडून उत्तर झाल्यानंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी अध्यक्षांकडे मागितली. तसेच या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा आलेला असल्याने या मोर्चाला सामोरे जाण्याचे असल्याचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगत या प्रस्तावावर लवकर चर्चा घ्यावी अशी मागणी केली.

नेमक्या याच कालावधीत शिवसेनेचे सर्व आमदार नाणार प्रकल्पाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले आणि आमच्या प्रस्तावावर आधी चर्चा करण्याची मागणी करू लागले. काँग्रेसच्या सदस्यांनीही शिवसेने आधी आमचा स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याने आमच्याच प्रस्तावावर चर्चा घ्यावी अशी मागणी करू लागले.

परंतु शिवसेनेच्या आमदारांकडून घोषणोबाजी तशीच सुरु राहील्याने गोंधळ खुपच वाढला. त्यातच अध्यक्षांनी या सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची सूचना केली. त्यानुसार शिवसेनेचे सर्व सदस्य आपआपल्या जागेवर जाताच काँग्रेसचे सदस्य आमच्या प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी करू लागले. त्यामुळे शिवसेनेचे सर्व आमदार पुन्हा घोषणाबाजी करत पुन्हा मोकळ्या जागेत आले. शेवटी अध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले मात्र शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने कामकाज पुहा तहकूब करण्यात आले.

About Rajesh Salgaonkar

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *