नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला …
Read More »प्रताप सरनाईक यांचा निर्धार, ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्याचा निर्णय
भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये स्वदेशी सल्लागार कंपन्यांनाच प्राधान्य संशोधनात्मक क्षेत्रात भारतीय सल्लागार कंपन्यांना संधी
कौशल्य विभागाच्या सर्व संस्थांमध्ये संशोधनात्मक काम आणि सल्लागाराची भूमिका यासाठी केवळ स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. ‘आयटीआय’मध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम, विविध कार्यशाळा आणि रोजगारासंबंधी संशोधनात्मक अहवाल आणि धोरणाची रुपरेषा तयार करण्यासाठी विदेशी कंपन्यांऐवजी आता भारतीय सल्लागार कंपन्या नेमण्यात येतील. कौशल्य विभागाकडून …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी दोन निर्णयांना मंजूरी अकोला जिल्ह्यातील पाटबंधारे योजनांसाठी निधी मंजूर, इंटीलिजन्स ब्युरोला भूखंड
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील दोन लघुबंधारे योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरांचे बांधकाम करण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील घोंगा, कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती होणार घोंगासाठी ४ कोटी ७६ लाख, तर कानडीसाठी ४ कोटी ९२ …
Read More »राज्य सरकार घेणार हुडकोकडून दोन हजार कोटी रूपयांचे कर्ज छत्रपती संभाजीनगरला ८२२, नागपूर २३८, मीरा भाईंदरसाठी ११६ कोटी मिळणार
नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वहिश्याचा निधी उभारण्याकरिता हुडको कडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २२ लाख …
Read More »उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ
शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यातील सुमारे १ हजार ७८९ उपसा सिंचन योजनांच्या खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच त्याचा थेट फायदा या उपसा सिंचन …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही, बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात …
Read More »‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते वितरित राज्यातील ९१ लाख ६५ हजार१५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा
“शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी मंजुर निधी शेतक-यांच्या खात्यात वर्ग होईल. मंत्रिमंडळ सभागृह, ७ वा मजला, मंत्रालय मुंबई …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवावे
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून …
Read More »
Marathi e-Batmya