राजकारण

जिथं रूग्णसंख्या जास्त तिथे मागील वर्षासारखा लॉकडाऊन लावा मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुण्यासह ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे मागील वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर असून आम्हाला आदेश द्यायला लावू नका असा इशाराही न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला दिला. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई उच्च न्यायालयातडून घेण्यात येत असून …

Read More »

देवेंद्र फडणवीस हे आरक्षणच्या विरोधात; तर भाजपा दोन्ही बाजूने खेळतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त …

Read More »

महाविकास आघाडीसरकारवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि फडणवीसांची टीका महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द

पुणे-नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी …

Read More »

मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही, राष्ट्रपती, पंतप्रधान अनादर करणार नाहीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली आशा

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल जरी निराशाजनक असला तरी अद्याप लढाई संपलेली नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मागासप्रवर्ग ठरविण्याचा अधिकार राष्ट्रपती, पंतप्रधान यांना आहेत. त्यानुसार आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिणार असून आवश्यकता असेल तर आपण …

Read More »

न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा सवाल, आरक्षणप्रश्नी वर्षभर पंतप्रधानांनी वेळ का दिला नाही? न्यायालयाने वरंवटा फिरविला

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाला देत भाजपाचेच खासदार असलेले छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून …

Read More »

परमबीर सिंगाच्या अनेक भुमिका संशयास्पद असल्यानेच बदली माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आपल्या आरोपांचा पुर्नरूच्चार

मुंबई : प्रतिनिधी रोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चँनलमधुन परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप आता समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वझे व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भुमिका संशयास्पद असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. …

Read More »

फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती संचालक पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या

मुंबई : प्रतिनिधी ठाणे पोलिस आयुक्त व्ही.व्ही.फणसळकर यांना पदोन्नती देत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार आयपीएस अधिकारी सुरेशकुमार मेखला यांच्याकडे तात्पुरता सुपूर्द करण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक संदीप बिश्णोई यांची लोहमार्ग वरून न्यायिक व …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

मुंबई : प्रतिनिधी विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे असल्याची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. कोरोनाने …

Read More »

लोकशाही संपली असं जाहीर करा; नाहीतर चंद्रकांत पाटील माफी मागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी न्यायालयसुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला …

Read More »