गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १०० टक्के शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज अवादाच्या ११सौर प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत (एमएसकेव्हीवाय) २०२६ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. अवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समुहाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ११ सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प …
Read More »मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदींना सात प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल
मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे
लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा
शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर …
Read More »शिंदे सेनेचे १५ नगरसेवक शिवसेना उबाठात करणार वापसी सचिन अहिर यांचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले जवळपास १५ माजी नगरसेवक फुटीच्या मार्गावर असून ठाकरेंच्या शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेत हा मोठा राजकीय उलटफेर मानला जात असून चिन्हे दिसत शिवसेना (ठाकरे) नेते सचिन अहिर यांनी याबाबत दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटात …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.
काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …
Read More »अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या समितीचा कालावधी १४ सप्टेंबर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास …
Read More »उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …
Read More »
Marathi e-Batmya