राजकारण

लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास ब्रिटीश सरकारची परवानगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई-भंडाराः विशेष प्रतिनिधी लंडन येथे राज्य सरकारने विकत घेतलेल्या आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिल्याची माहिती माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लंडन येथील  १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये  …

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली विमानतळाला संभाजी महाराजांचे तर मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या …

Read More »

अर्थमंत्री पवारांकडून फक्त राजकियच उत्तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून प्रश्नांचा भडीमार

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. या मतांची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या चर्चेवरील उत्तरात फक्त राजकिय मुद्यांचीच उत्तरे असल्याची टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत पवार यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग …

Read More »

चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर …

Read More »

करोना आजारामुळे अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांची विधानसभेत माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आदी भागात करोना व्हायरसने प्रभावित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसेच या आजाराची लागण विधिमंडळाच्या सदस्यांना होवू नये याकरीता विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या शनिवारी संपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी …

Read More »

ऑफलाईन शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहीती

मुंबई : विशेष प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती …

Read More »

मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी १९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा …

Read More »

अर्थसंकल्प प्रादेशिक असमतोलाचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला नियम २९३ अन्वये सुरवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, …

Read More »

हवेली-वाघोलीची स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे महानगरातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याऐवजी वाघोली-हवेली तालुक्याची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार असून याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. हवेली तालुक्यातील वाघोली येथे सातत्याने वाहतूक कोंडी, अपुरा …

Read More »

सरकार पडण्यावर शरद पवार म्हणाले, शिमगा संपला ना आता? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपाला टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडव्या आधी पडणार असल्याचे भाकित भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला २४ तास ही उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतित्तुर देत म्हणाले की, शिमगा संपला ना? माझ्या माहितीप्रमाणे कालच झाल्याचा उपरोधिक टोला भाजपा नेत्यांना लगावत राज्यातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाल …

Read More »