एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक, इ-चालानबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगट स्थापणार विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्यावेळी दिले आश्वासन
मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले. वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून …
Read More »जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित करताच तटकरेंच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची योजना कधीच बंद होणार नसल्याची सारवासारव
नागपूरातील हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, लाडकी बहिण योजना आता सरकारला झेपत नसल्यानेच आता लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. तसेच केवायसी करणे आदी नियमांची शोधाशोध तुम्ही सरकारने सुरु केली आहे. आता आऊट ऑफ कंट्रोल होत असल्यानेच सरकारने या गोष्टी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हातावर लिहिलेली चिठ्ठी त्या डॉक्टर महिलेचीच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी …
Read More »स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका मुख्य निवडणूक अधिकारी यांची प्रसार माध्यमांना सूचना
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, …
Read More »इंडिगो प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल मक्तेदारी मोडून काढण्याची केली मागणी
इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, डिजीसीए DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित …
Read More »आकाश फुंडकर यांचे आदेश, नवीन कामगार संहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे विभागातील अधिकाऱ्यांना आदेश
केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिल्या आहेत. ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. बैठकीस कामगार …
Read More »हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ७५ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या पुरवणी मागण्या
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो पण त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नव्या प्रथे प्रमाणे पुरवणी मागण्या सादर करायच्या आणि त्या अधिवेशन संपेपर्यंत मंजूर करून घ्यायचे. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी …
Read More »महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात
राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …
Read More »माधुरी मिसाळ यांची माहिती, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार
महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई …
Read More »
Marathi e-Batmya