मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत गुन्हयाची माहिती लपवल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबईः प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा लपवल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात सिध्द झाले असून याप्रकरणी खटला चालविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती …
Read More »शिवसेनेला निवडणूकीच्या तोंडावरही मराठीची अॅलर्जी निवडणूक यादी इंग्रजी भाषेतून जाहीर
मुंबईः प्रतिनिधी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असे सातत्याने बिरूद मिरविणाऱ्या शिवसेनेला ऐन निवडणूकीतही मराठी भाषेची अॅलर्जी झाली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीतील उमेदवारांची यादी चक्क इंग्रजी भाषेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ७० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस या तीन …
Read More »खडसे, तावडे, महेता, पुरोहीत, सवरा, बावनकुळे, कांबळेंची नावे भाजपाच्या यादीतून गायब काँग्रेस, राष्ट्रवादीतील आयारामांना पहिल्या यादीत स्थान
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेना यांची युती झाल्याची प्रसिध्दी पत्रकान्वये घोषणा करत भाजपाने पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत विद्यमान मंत्रिमंडळातील बावनकुळे, तावडे यांची नावे वगळली तर माजी मंत्री असलेल्या महेता, कांबळे, सवरा आणि खडसे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, …
Read More »आदीत्य ठाकरे म्हणतात, निवडणूक लढविण्यासाठी हीच योग्य वेळ ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूकीच्या मैदानात
मुंबईः प्रतिनिधी आपण विधानसभा निवडणूक वरळी विधानसभा मतदारसंघातून लढविणार असून निवडणूक लढविण्याची हीच योग्यवेळ असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात जाहीर केले. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली …
Read More »अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार अन्यथा कोर्टात दाद मागणार असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार आहे. या तक्रारीची त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टात दाद मागणार आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत …
Read More »वंचित बहुजन आघाडीकडून १११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर जाती विरहीत समाजासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात जाती-विरहीत समाजाच्या निर्मितीसाठी एकजातीय आणि कुटुंबशाही असलेल्या राजकारण्यांना निवडूण देवू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच या निमित्ताने १११ उमेदवारांची दुसरी यादीही वंचितच्यावतीने प्रसिध्द करण्यात आली. विधानसभेकरीता वंचित आघाडीकडून डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक आदी क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही उमेदवारी …
Read More »रोज चार-पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार ५ ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा
मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील अशी घोषणा करत दरवेळी चार-पाच नावे जाहीर …
Read More »भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मी काय किंवा माझ्या घरातील कोणीही भाजपाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहीले तर कोणालाही मतदान करू नका तुम्हाला बिरोबाची शपथ आहे, असे भाजपाविरोधाचे आवाहन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना आज भाजपाचे पावन करून घेत बारामतीतून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव …
Read More »राजघराण्याच्या जावयासाठी कुलाब्याच्या निष्ठावंत आमदाराला नारळ ? बाहेरून येणाऱ्यांसाठी भाजपाच्या पायघड्याच
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणूकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे ४ टर्म अर्थात २० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या निष्ठावंत आमदाराला घरचा रस्ता दाखविणार असल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतून संभावित …
Read More »
Marathi e-Batmya