मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष …
Read More »गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास
पणजी : प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. …
Read More »नावाअगोदर चौकीदार लावणा-या चोरांपासून सावधानतेचा इशारा पोलिसांकडून त्याची चारित्र्यतपासणी करून घेण्याचे काँग्रेसचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या पहारेक-यांकडेही लोक संशयाने पाहू लागल्यामुळे प्रामणिक पहारेक-यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेक-याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी …
Read More »दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …
Read More »भाजप उधार उसनवारीवर चालणारा पक्ष काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी भाजपमध्ये आणखी आवक होणार असल्याची सुवार्ता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐकवली आहे. त्याचे काय व्हायचे ते होईल पण या निमित्ताने भारतीय जनता पक्ष हा उधार उसनवारीवर चालणारा पक्ष आहे हे मात्र सिद्ध झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन …
Read More »जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …
Read More »वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर सोलापूर-अकोला येथील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
मुंबई: प्रतिनिधी राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूण ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली असून धनगर समाजाला आजच्या यादीत पाच ठिकाणी तर माळी समाजाला दोन्ही ठिकाणी आणि बौध्द समाजाला चार ठिकाणी तर वडार, होणार, कोळी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वच …
Read More »पार्थ पवार, डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी अखेर जाहीर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली घोषणा
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरी- धनराज महाले, नाशिक- समीर भुजबळ, शिरुर- डॉ अमोल कोल्हे, बीड – बजरंग सोनवणे, मावळ- पार्थ पवार या नावांची घोषणा केली. …
Read More »सीएसएमटी दुर्घटनेतील पीडीतांच्या घरातील व्यक्तीला नोकरीत घ्या काही लाखाच्या मदतीने त्यांचे काही होणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भावना
मुंबईः प्रतिनिधी कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. …
Read More »दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य
औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …
Read More »
Marathi e-Batmya