राजकारण

पाच वर्षातल्या ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. भाजप-शिवसेना …

Read More »

प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे जाहीर केले. …

Read More »

काँग्रेसची वाट बघणार नाही मात्र एमआय़एमशी चर्चा सुरुच ठेवणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांशी वंचित आघाडीचे पदाधिकारी संपर्कात होते. मात्र त्यांच्याकडूनही लोकसभेच्या कालवधीप्रमाणे फक्त चर्चेत गुंतवणूक ठेवण्याचा प्रकार सुरु असल्याने त्यांची फारकाळ वाट बघणार नसल्याचे जाहीर करत लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. …

Read More »

देशात मंदी असताना मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करण्यात मश्गुल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी देशात १०० टक्के आर्थिक मंदी असताना देशाचे पंतप्रधान मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करून सरकारचे १०० दिवस साजरे करण्यात मश्गुल आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मोदी सरकारचे १०० दिवस यावर बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला. देशातील …

Read More »

पक्षफुटीच्या भीतीने औरंगाबादेत गणेशोत्सोवानंतर मनसेची पुर्नरचना मनसे नेते अभिजीत पानसे यांची माहिती

औरंगाबादः प्रतिनिधी औरंगाबादेतील बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या हालचाली करंत आहेत. त्यातच जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी पक्ष सोडण्याकरता राजीनामा वरिष्ठांकडे सूपूर्द केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पुर्नरचनेचा विचार सुरू असून गणेशोत्सवानंतर पुर्नरचना करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जेष्ठ नेते अभिजीत पानसे यांनी दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या मनमानीला …

Read More »

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या पंकजा मुंडे साडेचार वर्षात अनेक पुरस्कारांनी ग्रामविकास, महिला व बाल कल्याण विभागाचा गौरव

मागील साडेचार वर्षांपासून ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळत आहे. ग्रामसडक योजना, रस्ते बांधणी असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, एका बाजूस राज्यातील ग्रामविकासाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील कुपोषण कमी करण्याबरोबरच त्याच्या समूळ उच्चाटनासाठीही प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिला सक्षमीकरणासाठीही अनेक योजना आखल्या जात आहेत. त्या योजना …

Read More »

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आमदार गजभिये आणि प्रविण भोटकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणाचाच नव्हे तर प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून मंत्रालय असून या मंत्रालयाच्या इमारतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले नव्हते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि सामाजिक कार्यकर्त्ये प्रविण भोटकर यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर डॉ. आंबेडकरांचे आणि संविधानाचे प्रस्ताविका बसविण्यात येणार आहे. याचे …

Read More »

पंतप्रधान मोदींच कौतुक कोणत्या गोष्टीवरून करू -उद्धव, माझा लहान भाऊ- पंतप्रधान पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या तीन प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं किती गोष्टींसाठी अभिनंदन करु? काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं, आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण होईल असाही विश्वास शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तर उध्दव ठाकरे हे माझे लहान भाऊ असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

मेट्रो भवन आणि प्रधानमंत्री आवास योजना टेंडर घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आरे कॉलनी येथे एमएमारडीए मार्फत होणा-या मेट्रो भवन व सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने मार्फत ८९ हजार घरे बांधण्याच्या टेंडरमधील महाघोटाळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्याच्या कागदपत्रांसहित आज सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकृत तक्रार केली. या टेंडर घोटाळ्यामध्ये विशिष्ट …

Read More »

चुकीच्या माहितीच्या आधारे टीका नको ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोणत्याही किल्ल्यावर हॉटेल नसल्याचा भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची सारवासारव

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवलेल्या कोणत्याही ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यावर हॉटेल होणार नाही. पर्यटन खात्यातर्फे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे किल्ले हे कोणत्याही संरक्षित किल्ल्यांच्या यादीतील नाहीत, असे असताना विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करत असून ते जनतेमध्ये संभ्रम पसरवत असल्याची सारवासारव भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी …

Read More »