प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे जाहीर केले. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी आरोप केला.
प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणूकीच्यावेळी वेगळे लढले होते. त्यांना आघाडी नकोच आहे. आणि आताही त्यांना वेगळंच लढायचं आहे.
वंचितमुळे मत विभाजन होवून त्याचा फायदा शिवसेना – भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे. जनतेने लोकसभेत जी चुक केली ती चुक पुन्हा विधानसभेत ते करणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत एकजुटीने लढतील आणि जे मित्रपक्ष सोबत होते ते सर्व घेवून विधानसभा ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *