राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी केला एसटीने प्रवास एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले

गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नांचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत शिष्यवृत्तीसाठी तीच माहिती देण्याची आवश्यकता नसून हीच माहिती ग्राह्य …

Read More »

डॉ नरेंद्र जाधव यांची माहिती, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन शिफारस विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे मत, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम राबवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील ७५०० युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ व पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. ‘नमो पर्यटन’ उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत, जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन …

Read More »

पियुष गोयल म्हणाले, जीएसटी सुधारणा हे विकसित भारत २०४७ च्या दिशेने टाकलेले पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज आहे, या शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीएसटी सुधारणा हा आत्मनिर्भर भारत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाहिरातीवरून माफी मागण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छ. संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. …

Read More »