पारोळा : प्रतिनिधी वसई, विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत भाजप-शिवसेनेला पालघरमधील विकासात रस नसून फक्त इथल्या जमिनीत रस असल्याचा आरोप त्यांनी …
Read More »सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक होळकर नामविस्तारास न्यायालयाची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा राज्याचे शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास स्थगिती देण्याचा निर्णय दिला. विद्यापीठाला पुण्यश्लोक …
Read More »पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम जाहीर विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जूनला मतदान
मुंबई : प्रतिनिधी मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरूवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. याआधी आठ जूनला यासाठी मतदान होणार होते. परंतु, कपिल पाटील आणि निरंजन डावखरे …
Read More »पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजपसरकार तुंबडया भरतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबडया भरत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप दोन्ही ठिकाणी करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल …
Read More »जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा दावा
वानगाव : प्रतिनिधी सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे …
Read More »भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची टीका
पालघर : प्रतिनिधी चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो …
Read More »डाव्या पक्षांचा मोदी सरकार विरोधात पोल खोल हल्लाबोल आंदोलन २३ मे रोजी ठाणेसह देशभरात आंदोलन १०६ जन संघटना सहभागी होणार
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या चार वर्षात देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला असून सरकार ठिकठिकाणी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात सहा डावे पक्ष – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल लिबरेशन ),एसयुसीआय (कम्युनिस्ट …
Read More »शिवसेनेला दोन जागांचा फायदा तर भाजपने गड राखला राष्ट्रवादीने लाज राखली तर काँग्रेसला धक्का
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेला नाशिक आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे. तर अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-ग़डचिरोली या मतदारसंघातील जागा कायम राखण्यात भाजपला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे सध्या एक जागा राखण्यात यश आले आहे. …
Read More »काँग्रेसच्या आरोपावर भाजपचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नसल्याचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी पालघर पोटनिवडणूकीत सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर त्यास काही तासांचा अवधी उलटून जात नाही. तोच भाजपकडून याबाबतचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रवक्ते केशव …
Read More »ओबीसी समाजासाठी भुजबळांची मागणी आणि मंत्री राम शिंदे यांची तत्परता ओबीसी विभागाकरिता अर्थसंकल्पात २९६३ कोटी रुपयांची तरतूद
नाशिक : प्रतिनिधी राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. मात्र या विभागासाठी अर्थसंकल्पात अत्यंत तुटपुंजी तरतूद केलेली असल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना मांडलेली होती. यावर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास …
Read More »
Marathi e-Batmya