राजकारण

एकनाथ शिंदे यांचा इशारा, विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा विरोधकांना इशारा

विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण …

Read More »

मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …

Read More »

शनिवार वाड्यात नमाज पठण ? भाजपा खासदार मेधा कुलकर्णी पतित पावनच्या कार्यकर्त्यांसोबत गोमूत्र शिंपून जागेचे शुद्धीकरण केले

उभ्या महाराष्ट्राला मनूवादी विचारणीची ओळख आणि त्याची शिल्लक अवशेष असलेल्या पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यानी रा. स्व.संघ प्रणित पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाड्यातील त्या जागेचे गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच

देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …

Read More »

राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य

दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …

Read More »

संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …

Read More »

नाशिक विमानतळावरील नवीन धावपट्टी आणि विमानसेवा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी करून द्या मंत्री छगन भुजबळ यांचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,..हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे

एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे आणि दुसरीकडे धर्मांच्या हक्काच्या जमिनी लाटायच्या, हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील …

Read More »

भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती …

Read More »

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग

दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. …

Read More »