राजकारण

अजित पवार यांची माहिती, नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी नांदेड, संभाजीनगर जिल्ह्यांसाठी १९१ कोटींच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला …

Read More »

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी भाजपाकडून सातत्याने सैन्यांचा अपमान, मोदी व नड्डांनीच माफी मागावी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही, महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ” स्मार्ट बस ” येणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीची स्मार्ट बस

भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

अजित पवार म्हणाले, बाजार समित्यांचे सक्षमीकरण शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे राष्ट्रीय बाजार अनुषंगाने राज्यातील बाजारांच्या विकासात शेतकऱ्यांचे हित व सदस्यांच्या अधिकारांचेही रक्षण व्हावे

राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा

ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी …

Read More »

नागरीकांनी नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन नोंदणी करून प्रशिक्षण घ्या आणि भारतीय नागरिक असणे ही प्रथम अट

राज्यात जास्तीत जास्त नागरीकांनी नागरी संरक्षण दलात “स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. पोलीस कुटुंबातील माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस बॉईज आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील इतर सदस्य, माजी सैनिक यांना जास्तीत जास्त प्रमाणात नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरी संरक्षण कायदा १९६८ नुसार वयाची १८ वर्षे पूर्ण असलेले, प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले …

Read More »

मर्सिडीज बेंझ इंडियाची समृद्धीवरील भागीदारीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्वागत सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल

samruddhi समृद्धी महामार्ग

महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे  सहयोग करत आहे ही निश्चितच स्वागतार्हाय बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला  …

Read More »

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत, वाढता वाढता वाढे निवडणूकीची अद्याप चर्चा नाही पण जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत वाढ

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप त्या अनुषंगाने पुढील कारवाईला सुरुवात केली नाही की, राज्याच्या मुख्य सचिवांकडून यासंदर्भात पत्रक जारी केले नाही. असे असताना राज्य सरकारने सुरु केलेली मुदत वाढीचे शेपूट आता थेट वर्षाच्या …

Read More »