इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत युद्ध पुकारले. या तीन चार दिवसांच्या कालावधीत अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात हवाई बॉम्ब हल्ले कायम ठेवले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर म्हणून त्या दोन देशांसह जिथे जिथे अमेरिकच्या नौलाची थळ आहेत त्या ठिकाणावर बॉम्बहल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या आणि फिरायला गेलेले …
Read More »दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार दुबईत अडकलेल्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात
दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धुलीवंदनाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती जाहीर केली. धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना …
Read More »प्रताप सरनाईक यांचा विश्वास, जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये… एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत …
Read More »फेब्रुवारी संपला, लाडकी बहिणींना हप्ता कधी मिळणार मार्च महिना सुरु झाला मात्र राज्याच्या तिजोरीचे गणित बिघडलेले
महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. महायुती सरकारने सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे म्हटल्याने ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र आता सरकारला ह्प्ता देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते. फेब्रूवारी संपला तरी हप्ता अंद्याप मिळाला नाही त्यामुळे फेब्रूवारी मार्च महिन्याचा …
Read More »मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, १५ हजार युवकांना प्रशिक्षण आणि ५ हजार रोजगार निर्मिती ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल
युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०२७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना देशातील अशी पहिलीच सर्वेक्षण योजना असून रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने …
Read More »देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय
“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली” असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी …
Read More »रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची भाजपा सरकारच्या करंटेपणामुळे दुरवस्था-हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा
राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …
Read More »अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एएआयबी चा प्राथमिक अहवाल जाहिर विमान पहिल्यांदा झाडावर आदळले आणि कमी दृश्यमानतेमध्ये लॅडींगचा प्रयत्न
शनिवारी, नागरी उड्डाण मंत्रालयाची चौकशी करणारी शाखा असलेल्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताबाबत २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात कमी दृश्यमानता, VFR (व्हिज्युअल फ्लाइट रूल्स) चे संभाव्य उल्लंघन आणि बारामतीच्या अनियंत्रित विमानतळावरील सुरक्षा त्रुटी आणि विमान पहिल्यांदा झाडावर आदळल्याची माहिती …
Read More »
Marathi e-Batmya