कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-२०२५ (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक
सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आयटी उद्योग बंगळुरूला जाईपर्यंत पालकमंत्री झोपा काढत होते का ? महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा …
Read More »अजित पवार हिंजवडीच्या सरपंचाला म्हणाले, आयटी पार्क चालले पुण्यातून…सगळं वाटुळं झालं सरपंच गणेश जांभुळकरांना सुनावत ते काम झालंच पाहिजे असा दमही दिला
पुणे शहराचा विकास करताना शरद पवार यांनी जाणिवपूर्वक आयटी पार्कला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हिंजवडी परिसरात जागा देत पुणे शहराला आयटी हब मध्ये परावर्तित केले. परंतु हिंजवडीबरोबर आजूबाजूच्या भागात शहरीकरण आणि लोकवस्ती वाढली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील कामे मार्गी …
Read More »डॉ पंकज भोयर यांचे आदेश, राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करावे शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिटही करा
विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या असल्याने राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने राज्यातील शाळा इमारत सुरक्षितेसाठी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस …
Read More »नितेश राणे म्हणाले, मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू सरकारच्या सहाय्याने प्रकल्प उभारले
मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, गडचिरोलीत पाच हजार कुटूंबासाठी ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ आकांक्षित तालुक्यांचे होणार सक्षमीकरण
गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ आशिष शेलार यांची माहिती, अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या अॅड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे …
Read More »चंद्रकांत पाटील यांची घोषणा, राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी शिफारस करणार अपघाती विमा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस करणार
सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya