राजकारण

अंजली दमानिया यांनी उघड केले धनंजय मुंडे -वाल्मिकी कराड यांच्यातील संबध सात-बाराचे उतारे दाखवित जमिनीही दोघांच्या नावावरः सर्वाधिक पिस्तुलाचे परवाने बीडमध्ये

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबधही उजेडात आले. त्यासाठी पंकजा मुंडे यांनीच दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांचे पानही ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिकी कराड असे सांगत धनंजय मुंडे आणि वाल्मिती कराड यांच्यातील संबध …

Read More »

निवडणूकीमुळे थांबलेली लाडकी बहिण योजना पुन्हा सुरू महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा यशस्वी प्रारंभ

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया …

Read More »

मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांसोबत प्रदीर्घ बैठक

राज्याचे अर्थमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सुत्रे हाती घेताच आज मंगळवारी (२४ डिसेंबर) मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन …

Read More »

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना उत्तम सोयीसुविधा द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, याकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हवेली तालुक्यातील …

Read More »

शिवराज सिंह चौहान यांची घोषणा, प्रत्येक गरीब शेतकऱ्याला ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था अर्थात अटारी, शिवाजीनगर येथे …

Read More »

दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचेही वाटपः जाणून घ्या कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या बंगल्याची यादी जाहिर

राज्य सरकारकडून आज मंत्र्यांना बसण्यासाठी आणि बसून त्या त्या खात्याचा कारभार हाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. त्यास काही तासांचा अवधी जात नाही तोच राज्य मंत्रिमंडळांतील मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या बंगल्यांचे वाटपही आजच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहिर करण्यात आलं. या बंगल्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याची …

Read More »

मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपः मंत्री कोणत्या दालनात बसणार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आणि विस्तारीत कोणत्या इमारती हे मंत्री बसणार

राज्य मंत्रिमंडळातील बिन खात्याच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर वास्तविक पाहता राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री झालेल्या आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र या आमदारांना बसणार कोठे याची चिंता फारशी सतावत नव्हती. मात्र अखेर सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांना बसावयाच्या दालना संदर्भात शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार महसूल मंत्री …

Read More »

शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचा आरोप, राजकिय सोयीनुसार मोहन भागवतांचे वक्तव्य मोहन भागवत यांच्या त्या वक्तव्यावर शंकराचार्यांची टीका

काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मातील शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांच्याच एका विधानावरून टिका केली असून सत्ता मिळाल्यावर मंदिर शोधू नका असे सांगत राजकिय सोयीनुसार ते वक्तव्य करत असल्याची टीका केली. यावेळी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वर म्हणाले की, सत्ता हवी होती तेव्हा सारखे मंदिर-मंदिर असा जप लावला …

Read More »

छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, अजित पवार म्हणाले पक्षातंर्गत मामला छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष्य

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी …

Read More »

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट संबधित आरोपीला अटक करून कारवाई करेल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परभणीत राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधत शिवसेनाओएफसीचे आमदार तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज …

Read More »