राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय सावित्रीबाई फुले स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद, गोसीखुर्दसाठी २५ हजार कोटी रूपयांची तरतूद, कामगार संहिता

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जवळपास ८ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या गोसीखुर्द धरणाच्या ऱखडलेल्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार संहिता नियमास मान्यताही देण्यात आली. विभागीय …

Read More »

कामगार कल्याण मंडळाकडून या कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहिर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून जाहिरः विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ जाहीर

राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२३ कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले आहेत. कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार नाशिकमध्ये २९ एप्रिलला सद्भावना यात्रा, १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ रोजी परभणीत यात्रा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले …

Read More »

नितेश राणे यांची माहिती, मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मानले. ते मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदे …

Read More »

किरण रिजिजू यांची ग्वाही, वक्फ कायद्यामुळे गरीब, गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल कोणाच्याही अधिकाऱांचे हनन होणार नाही

वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. सर्व गरीब गरजू मुस्लिमांना न्याय मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक, …

Read More »

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यांचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या भारताची बदनामी करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात. काँग्रेसने आपले मूळ विचार सोडून दिले असून आता काँग्रेसचे राजकारण हे चापलुसीचे आहे तर भाजपाचे विकासाचे राजकारण आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना, नाशिक बाह्यवळण प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वॉररुम बैठकीत घेतला १५ प्रकल्पांचा आढावा प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररुम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, ईडी ही मोदी-शाह यांची वसूली गँग, आरोपपत्राला भीक घालत नाही सोनिया गांधी व राहुल गांधींविरुद्ध ईडीने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र एक राजकीय षड्यंत्र

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र तहानलेलाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा नेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा …

Read More »