राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले… खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या

कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते …

Read More »

संजय निरूपम यांचा आरोप, दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली

दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा दावा शिंदे गटाचे शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, “सौगात-ए-मोदी की सौगात-ए-सत्ता?” मग त्या मंगळसूत्रांच काय झालं टोपी घालणारे उडाणटप्पू मुस्लिमांच्या घरी सौगात-ए-मोदी कसं घेऊन जाणार

मध्यंतरी मुस्लिम समाजातील काही जणांना शिवसेना उबाठाला मतदान केले म्हणून एशंशि (शिवसेना शिंदे) यांना मिर्च्या झोंबल्या. त्यावरून भाजपाचे बिहार आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सौगात -ए-मोदी पाठविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मग लोकसभा निवडणूकीत तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना देणार असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांनी मग हिंदूत्व सोडलं का असा सवाल …

Read More »

महाराष्ट्र बदलाची सुरुवात मंत्रालयापासूनः चार दिवसानंतर मंत्रालयात आले पाणी महायुती सरकारला मोठा जनाधार सरकारच्या विरोधात बोलू तर भलतीच कारवाई होईल म्हणून अधिकारी चिडीचूप

राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार, विकासाच्या वाटेवर चालणार म्हणून भला मोठा बँनर शपथविधीच्या ठिकाणी लावला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र आता बदल्याशिवाय राहणार नाही, विकासाच्या वाटेवर चालल्याशिवाय राहणार नाही …

Read More »

सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळ उभारणीसाठी कार्यवाही करा नागरिकांना किमान ५ कि.मी च्या आतमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील नागरिकांना किमान ५ कि.मी च्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना व आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करुन आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात असे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्य सरकार तात्काळ बरखास्त करा भाजपा परिवारातील संस्थांकडून औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन

राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार …

Read More »

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक २०२५ हे विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केले असून, यामुळे राज्यातील नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक प्रणाली तयार होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली माहिती

एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का?

बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा …

Read More »